virat kohli fight  twitter
क्रीडा

Virat Kohli Viral Video: लाईव्ह सामन्यात राडा! श्रीलंकन गोलंदाजाकडून विराटला शिवीगाळ? पाहा VIDEO

Virat Kohli Fight With Asitha Fernando: श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज असिथा आणि विराट कोहलीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका यांच्यातील शेवटचा सामना पार पडला. या सामन्यातही भारतीय संघाकडून फ्लॉप कामगिरी पाहायला मिळाली आहे. २४९ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव अवघ्या १३८ धावांवर आटोपला. यासह भारतीय संघाला हा सामना ११० धावांनी गमवावा लागला आहे. दरम्यान या सामन्यानंतर विराट कोहलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (Virat Kohli)

भारतीय संघातील अनुभवी फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) हा आपल्या आक्रमकतेसाठी ओळखला जातो. मैदानावर खेळत असताना त्याची आक्रमकता दिसून येत असते. मात्र यावेळी श्रीलंकेचा गोलंदाज विराटला काहीतरी बोलताना दिसून आला आहे. दोघांमध्ये बाचाबाची झाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.

तर झाले असे की, भारतीय संघ २४९ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर आला. भारतीय संघाची धावसंख्या ४१ वर १ गडी बाद असताना विराट कोहली ४ धावांवर फलंदाजी करत होता. त्यावेळी श्रीलंकेकडून पाचवे षटक टाकण्यासाठी असिथा गोलंदाजीला आला. या षटकातील शेवटचा चेंडू विराटने डिफेन्स केला. त्यावेळी असिथाने (Asitha fernando) विराटला काहीतरी म्हटलं. विराटनेही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं.

विराट श्रीलंकेत फेल

या मालिकेसाठी श्रीलंकेत खेळण्यासाठी येण्यापूर्वी विराटचा श्रीलंकेतील रेकॉर्ड दमदार होता. मात्र या मालिकेत त्याला नावाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. कोलंबोत दमदार रेकॉर्ड असलेल्या विराट कोहलीला तिन्ही सामन्यात ३० धावांचा आकडाही पार करता आलेला नाही. मालिकेतील पहिला सामना बरोबरीत समाप्त झाला होता. या मालिकेत विराटला २४ धावा करता आल्या होत्या. तर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात विराटने २३ धावांची खेळी केली होती. तर मालिकेतील शेवटच्या सामन्यात विराट अवघ्या २० धावांवर तंबूत परतला आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

SCROLL FOR NEXT