SRH vs PBKS Live updates sunrisers hyderabad need 215 runs to win amd20000 twitter
क्रीडा

SRH vs PBKS: अखेरच्या सामन्यात पंजाबच्या फलंदाजांची बॅट तळपली! हैदराबादसमोर विजयासाठी २१५ धावांची गरज

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेतील ६९ वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात पंजाब किंग्ज संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्ज संघाने २० षटक अखेर २१४ धावा केल्या आहेत. सनरायझर्स हैदराबादला हा सामना जिंकण्यासाठी २१५ धावांची गरज आहे.

या सामन्याबद्दल बोलयचं झालं, तर पंजाबचा कर्णधार जितेश शर्माने नाणेफेत जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाबकडून अथर्व तायडे आणि प्रभसिमरन सिंगची जोडी मैदानावर आली. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी दोघांनी मिळून ९७ धावा जोडल्या. प्रभसिमरन सिंगने ७१ धावांची खेळी केली. तर अथर्व तायडेने ४६ धावांचे योगदान दिले. तर आक्रमक फलंदाज रिले रुसोने ४९ धावांचे बहुमुल्य योगदान दिले. शेवटी कर्णधार जितेश शर्माने ३२ धावांची खेळी करत संघाची धावसंख्या ५ गडी बाद २१४ वर पोहचवली.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११

पंजाब किंग्ज – प्रभसिमरन सिंग, अथर्व तायडे, रिली रोसो, शशांक सिंग, जितेश शर्मा (कर्णधार/यष्टीरक्षक), हरप्रीत ब्रार, ऋषी धवन, हर्षल पटेल, राहुल चहर, आशुतोष शर्मा, शिवम सिंग.

इम्पॅक्ट प्लेअर्स – अर्शदीप सिंग, प्रिन्स चौधरी, विद्वथ कवेरप्पा, हरप्रीत सिंग भाटिया, तनय त्यागराजन

सनरायझर्स हैदराबाद – अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी, राहुल त्रिपाठी, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), अब्दुल समद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, विजयकांत व्यासकांत, टी नटराजन, शाहबाज अहमद, सनवीर सिंग.

इम्पॅक्ट प्लेअर्स – ट्रॅव्हिस हेड, उमरान मलिक, ग्लेन फिलिप्स, जयदेव उनाडकट, वॉशिंग्टन सुंदर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT