pat cummins  twitter
Sports

Pat Cummins Statement: ऑस्ट्रेलियाचं नेमकं गंडतय तरी कुंठ? पॅट कमिन्सने स्वत: केला खुलासा

South Africa vs Australia: या सामन्यानंतर पॅट कमिन्सने मोठा खुलासा केला आहे.

Ankush Dhavre

Pat Cummins Statement:

पाच वेळच्या ऑस्ट्रेलिया संघाला वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत सुर गवसलेला नाही. पहिल्या सामन्यात भारतीय संघाविरुद्ध झालेल्या पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेनेही दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला धूळ चारली आहे.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने १३४ धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. दरम्यान या सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नेमकं चुकलं तरी कुठं? याबाबत भाष्य केलं आहे.

Pat Cummins Statement:

या सामन्यानंतर पॅट कमिन्स म्हणाला की, ' आम्ही दक्षिण आफ्रिकेला ३११ धावांवर रोखलं. त्यानंतर आम्हाला असं वाटलं होतं की, आम्ही हे आव्हान यशस्वीरित्या पूर्ण करू. आमच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. आम्हाला असं वाटलं की, अंडर लाईट चेंडू बॅटवर चांगल्याने येईल मात्र असं काहीच झालं नाही.'

तसेच तो पुढे म्हणाला की, 'आज म्हणण्यासारखं काही नाही. या पराभवामुळे आम्ही निराश झालो आहे. आम्ही प्रयत्न करू की, येणाऱ्या सामन्यांमध्ये आम्ही दमदार कमबॅक करू. काही ऋटी आहेत ज्या आम्ही भरून काढण्याचा प्रयत्न करू.'

ऑस्ट्रेलियाचा संघ हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील बलाढ्य संघ आहे. मात्र या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला या सामन्यात हवी तशी सुरूवात करता आलेली नाही. आता ऑस्ट्रेलियाचा संघ २० ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरूद्ध दोन हात करताना दिसून येणार आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ दमदार कमबॅक करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. (Latest sports updates)

दक्षिण आफ्रिका - ऑस्ट्रेलिया सामन्यानंतर अशी आहे पाँईंट्स टेबलची स्थिती..

सलग २ सामन्यांमध्ये २ विजय मिळवणारा दक्षिण आफ्रिकेचा संघ पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी विराजमान आहे. ४ गुणांसह न्यूझीलंडचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडचे दोघांचेही ४-४ पॉइंट्स आहेत. मात्र नेट रनरेटच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने अव्वल स्थान गाठलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jasmine Oil Benefits For Skin And Hair: थंडीत चेहरा अन् केसांना लावा चमेली तेल, ४-५ दिवसात दिसेल मोठा फरक

Link Road: नवी मुंबईत १४ किमीचा नवा लिंक रोड, एक्सप्रेसवे अन् JNP हाकेच्या अंतरावर येणार, वाचा सविस्तर

ZP Election Date : ४६ दिवस शिल्लक, जिल्हा परिषद निवडणुकीच्या घोषणा कधी?

Plane Crash: लँडिंगदरम्यान विमान कोसळलं, ७ जणांचा मृत्यू; पाहा थरकाप उडवणारा VIDEO

Nashik Travel : किल्ल्यांचे विहंगम दृश्य अन् आव्हानात्मक ट्रेक, नाशिकमध्ये लपलंय 'हे' सुंदर ऐतिहासिक ठिकाण

SCROLL FOR NEXT