SOUTH AFRICA twitter
Sports

WTC Points Table: दक्षिण आफ्रिकेच्या विजयाने न्यूझीलंड- इंग्लंडचं टेन्शन वाढलं; टीम इंडिया कितव्या स्थानी?

World Test Championship Points Table: दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने शानदार विजय मिळवला आहे.

Ankush Dhavre

SA vs BAN 1st Test: पु्ण्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात निर्णयाक कसोटी सामना सुरु आहे. तर बांगलादेशमध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश यांच्यातील २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना पार पडला.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने यजमान बांगलादेशचा ७ गडी राखून विजय मिळवला आहे. यासह २ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. या विजयाचा दक्षिण आफ्रिकेला WTC च्या गुणतालिकेत मोठा फायदा झाला आहे. या सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानी होता. मात्र हा संघ आता चौथ्या स्थानी पोहोचला आहे. तर बांगलादेशचा संघ सातव्या स्थानी कायम आहे.

दक्षिण आफ्रिकेचा विजय हा इंग्लंड आणि न्यूझीलंडसाठी टेन्शन वाढवणारा ठरला आहे. हे दोन्ही संघ १-१ स्थान मागे सरकले आहेत. भारतीय संघाला पराभूत केल्यानंतर न्यूझीलंडचा संघ चौथ्या स्थानी पोहोचला होता. मात्र आता हा संघ पाचव्या स्थानी पोहोचला आहे. तर यापूर्वी पाचव्या स्थानी असलेला इंग्लंडचा संघ सहाव्या स्थानी सरकला आहे.

या यादीत पाकिस्तानचा आठव्या स्थानी आहे. भारतीय संघाबद्दल बोलायचं झालं, तर भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवानंतरही भारतीय संघ अव्वल स्थानी आहे.

मात्र विजयाच्या सरासरीत घसरण झाली आहे. भारतीय संघाची विजयाची सरासरी ६८.०६ वर जाऊन पोहोचली आहे. तर दुसऱ्या स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाची विजयाची सरासरी ६२.५० इतकी आहे. त्यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात फायनलमध्ये जाण्यासाठी चुरशीची लढत सुरु आहे.

तसेच बांगलदेश विरुद्ध न्यूझीलंड सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर या सामन्यात बांगलादेशी फलंदाजांचा फ्लॉप शो पाहायला मिळाला. पहिल्या डावात फलंदाजी करताना बांगलादेशचा डाव १०६ वर आटोपला. या धावांच्या प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने ३०८ धावा करत मोठी आघाडी घेतली. दुसऱ्या डावात फलंदाजी करताना बांगलादेशने ३०७ धावा करत दक्षिण आफ्रिकेसमोर जिंकण्यासाठी १०६ धावांचे आव्हान ठेवले. हे आव्हान दक्षिण आफ्रिकेने सहज पूर्ण करत सामना जिंकला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

Nitesh Rane: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न?'सुवर्णगडा'वर नेमकं काय घडलं?

Bigg Boss 6: दिपाली सय्यद ते राकेश बापट; कोण-कोण आहे 'बिग बॉस मराठी 6'मध्ये? वाचा सविस्तर यादी

Uddhav Thackeray: भाजपचा मुंबईला परत बॉम्बे करायचा डाव; शिवाजी पार्कातील सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

SCROLL FOR NEXT