Sourav Ganguly Saam Tv
Sports

Sourav Ganguly : सौरव गांगुली, जय शहा यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे.

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. त्यांच्या कार्यकाळाच्या मुदतवाढीच्या प्रकरणावर सुनावणी देताना सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयचा कार्यकाळ वाढवण्यासंबंधीच्या घटनादुरुस्तीला मान्यता दिली आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह हे पदावर कायम राहू शकतील.

बीसीसीआयने (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांचा कार्यकाळ वाढवण्यासाठी अर्ज दाखल केला होता आणि आपल्या नवीन घटनेत दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. कारण प्रशासकांसाठी निश्चित करण्यात आलेला तीन वर्षांचा कूलिंग ऑफ पिरियडची तरतूद रद्द करण्यात यावी.

'कूलिंग पीरियडबाबत नवीन प्रणाली बनवण्याचा प्रस्ताव देत आहोत. कोणताही सदस्य राज्य परिषद किंवा बीसीसीआयचा सलग दोन वेळा अध्यक्ष असू शकतो, पण त्यानंतर कूलिंग पीरियड पाळावा लागेल. कोणताही सदस्य ३ वर्षांसाठी सलग दोनदा निवडून येण्यास हरकत नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

सौरव गांगुली 2019 पासून बीसीसीआयचे (BCCI) अध्यक्ष आहेत. त्यांचा कार्यकाळ या वर्षी संपत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीमुळे बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होऊ शकली नाही, त्यामुळे सौरव गांगुलीचा कार्यकाळ आणखी एक वर्षासाठी वाढवण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shampoo Tips: शॅम्पू करताना चुकूनही करू नका 'या' ७ चुका; केस होतील खराब, डॉक्टरांनी सांगितली योग्य पद्धत

Maharashtra News Live Update: MPSCने पुन्हा परीक्षा ढकलली; २५ ऑक्टोबरची गट-क पूर्व परीक्षा आता ३ जानेवारीला

Akash Dalvi : राजकीय वातावरण तापलं! भाजपच्या नगरसेवकावर जीवघेणा हल्ला, तिघांविरोधात गुन्हा दाखल

Walking After Dinner Benefits: जेवणानंतर १५ मिनिटे चालण्याची सवय लावा; शरीराला मिळतील 'हे' ७ आरोग्यदायी फायदे

Sleeping Issues : रात्रभर झोपूनही दिवसा झोप येते? 'या' गंभीर आजाराचे आहे लक्षण, वेळीच व्हा सावध!

SCROLL FOR NEXT