arrest saam tv
Sports

IPL 2022: गुजरात टायटन विरुद्ध लखनऊ सुपर जायंटवर घेतला सट्टा; तिघे अटकेत

या प्रकरणी तिघांवर जेल रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विश्वभूषण लिमये

सोलापूर : गुजरात टायटन विरुद्ध लखनऊ सुपर जायंट या आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील सामन्यावर सट्टा घेतल्या प्रकरणी साेलापूर पाेलीसांनी (solapur police) तिघांना ताब्यात (arrest) घेतले. या कारवाईत सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमाल साेलापूर (solapur) पाेलीसांनी ताब्यात घेतला आहे. (solapur latest marathi news)

आयपीएल सामन्या दरम्यान सोलापुरातील पाच्छा पेठेत सट्टा घेतला जात असल्याची माहिती साेलापूर पाेलीसांनी मिळाली. त्यानूसार पाेलीसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी तिघांना पाेलीसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक टीव्ही, एक लॅपटॉप, सात विविध कंपन्यांचे मोबाइल, एक सेटअप बॉक्स, एक कॅल्क्युलेटर असे साहित्य जप्त केले.

पाेलीसांनी दिलेल्या माहितीनूसार सुनिल दाते, विनायक पुरुड आणि चंदन बडगंची अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर जेल रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे जिल्ह्यात अंगणवाड्यांमधील पोषण आहाराची होणार तपासणी

Rahul Gandhi: आदिवासी विद्यार्थिनींची प्रेग्नेंसी टेस्ट? राहुल गांधींचं फडणवीसांना पत्र, सरकारसमोर उभे केले मोठे सवाल

Maharashtra Politics: निधीच्या वादावर तोडगा, महामंडळ वाटपाचा मुर्हूत; महायुतीच्या बैठकीत दोन महत्त्वाचे निर्णय

Tuesday Horoscope : आज या राशींच्या आयुष्यात होणार मोठा बदल; अचानक मिळेल गुड न्यूज, जाणून घ्या तुमची रास

MP Disqualification: आता सुप्रीम कोर्टात लागणार बंडखोर खासदारांचा निकाल; २० खासदारांवर अपात्रतेची टांगती तलवार

SCROLL FOR NEXT