Shweta Sehrawat Saam Tv
Sports

Shweta Sehrawat ने बनला विक्रम; द्विशतक झळकावणारी बनली पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू

Shweta Sehrawat : आज भारतीय फलंदाज रोहित शर्माचा विक्रम तुटता -तुटता वाचला. दिल्ली संघाची महिला क्रिकेटपटूने आज दमदार फलंदाजी करत द्विशतक केलं.

Bharat Jadhav

Shweta Sehrawat Indian woman cricketer Score 200 Hundred :

नागालँडविरुद्ध खेळताना दिल्लीची सलामीवीर श्वेता सेहरावतने १५० चेंडूत २४२ धावांची स्फोटक खेळी खेळली. या खेळीत श्वेताने ३१ चौकार आणि ७ षटकार मारले. दिल्लीने नागालँडविरुद्ध ४५५ धावा केल्या. लिस्ट ए कारकिर्दीत द्विशतक झळकावणारी श्वेता पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली. श्वेताची फलंदाजी पाहून ती रोहित शर्माचा विक्रम मोडणार, असं वाटत होतं. (Latest News)

सध्या देशात सीनिअर विमेन्स वनडे टूर्नामेंट महिला क्रिकेटर्सची लिस्ट-ए- टूर्नामेंट सुरू आहे. यात सर्व राज्यातील आणि केंद्रशासित राज्यातील संघाचे सामने होत आहेत. सध्या सुरू असलेल्या टूर्नामेंटमध्ये ४१ संघाने भाग घेतलाय. ही टूर्नामेंट ४ जानेवारीपासून सुरू झाली असून २० जानेवारीपर्यंत चालणार आहे. या टूर्नामेंटचा सेमीफायनल सामना २४ जानेवारी होणार आहे तर २६ जानेवारी रोजी अंतिम सामना होणार आहे.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सर्वाधिक व्यक्तिगत स्कोअर

सर्व प्रकारच्या क्रिकेट सामन्यांमध्ये तिचा हा सर्वाधिक स्कोअर आहे. व्यक्तिगत सर्वाधिक स्कोअर करणारी महिला क्रिकेटर बनलीय. दरम्यान श्वेताच्या आधी स्मृती मंधानाने द्विशतक केलं होतं. स्मृती मंधानाने अंडर-१९ मध्ये सामना खेळताना द्विशतक केलं होतं. तर श्वेताने वरच्या पातळीवरील क्रिकेटमध्ये द्विशत केलं आहे. श्वेताने नागालँडविरुद्ध धमाकेदार फलंदाजी करत १५० चेंडूंमध्ये २४२ धावा ठोकल्या. तिची फटेकबाजी पाहून ती रोहित शर्माचा २६४ धावांचा विक्रम मोडणार की काय असं वाटत होतं. पण ती अवघ्या २२ धावांनी रोहितच्या विक्रमापासून पिछाडीवर राहिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aamir Khan: 'गौरी हिंदू नाही..., माझ्या कोणत्याही पत्नीने धर्मांतर केलं नाही', 'लव्ह जिहाद'च्या आरोपांवर आमिर खानचं स्पष्टीकरण

Maharashtra News Live Update: सर्व शेतकऱ्यांसाठी सरसकट २ लाखांची कर्जमाफी - मुख्यमंत्री

Weight loss plan: 1 महिन्यात कमी करा 5 ते 7 किलो वजन कमी; तज्ज्ञांनी सांगितला सोपा डाएट आणि फिटनेस प्लॅन

Sex Racket Bust : स्पा सेंटरच्या आडून सुरु होती देह विक्री, ६ महिला आणि २ पुरुष नको त्या अवस्थेत; पोलिसांनी दार उघडलं अन्...

51 कर्मचारी-अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई! प्रशासकीय वर्तुळात खळबळ; महापालिकेत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT