shubman gill teased by ravindra jadeja  x
Sports

Shubman Gill : सारा तेंडुलकरची आई शुभमन गिलसमोर बसली, रवींद्र जडेजानं चांगलीच फिरकी घेतली; पाहा Video

Shubman Gill Sara Tendulkar : लंडनमध्ये एका कार्यक्रमाला सारा तेंडुलकर तिच्या आईवडिलांसोबत उपस्थित होती. या कार्यक्रमाला शुभमन गिलने सुद्धा हजेरी लावली होती. या कार्यक्रमातील व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

Yash Shirke

Video : भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल सध्या इंग्लंडमध्ये कमाल करत आहे. अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमध्ये त्याने शानदार कामगिरी केली आहे. शुभमनच्या नेतृत्त्वात भारताने एजबॅस्टनवर ऐतिहासिक विजय मिळवला. शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर शुभमन-सारा यांच्या डेटिंगच्या चर्चा पुन्हा सुरु झाल्या.

शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर हे इंग्लंडमध्ये एकाच कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. या कार्यक्रमामधील नवा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये शुभमन गिल टीम इंडियाच्या खेळाडूंसह बसल्याचे पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला सचिन तेंडुलकर पत्नी अंजली आणि लेक सारा यांच्यासह बसल्याचे पाहायला मिळते. तेव्हाचा रवींद्र जडेजा शुभमन गिलला चिडवले. ही घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली.

व्हिडीओमध्ये शुभमन गिल, केएल राहुल, रवींद्र जडेजा बाजूबाजूला बसलेले दिसतात. तेवढ्यात टाळ्या वाजायला सुरुवात होते. सर्वजण अंजली तेंडुलकर यांच्याकडे पाहायला लागतात. अंजली यांच्याकडे पाहत रवींद्र जडेजा शुभमन गिलला चिडवतो. जडेजा गिलला ज्या वेळेस चिडवत असतो, तेव्हा केएल राहुल आणि रिषभ पंत जोरात हसू लागतात.

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ सध्या इंग्लंडमध्ये आहे. यादरम्यान लंडनमध्ये युवराज सिंगच्या कॅन्सर फाउंडेशनद्वारे चॅरिटी डिनर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भारतीय संघातील खेळाडूंना आमंत्रित करण्यात आले होते. त्याशिवाय सचिन तेंडुलकर, विराट कोहली, ब्रायन लारा असे अनेक दिग्गज कार्यक्रमाला हजर होते. या कार्यक्रमातला सारा तेंडुलकर आणि शुभमन गिलचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna Crime : जालना हादरले; जुन्या वादातून तरुणाची हत्या, आई- वडिलांनाही बेदम मारहाण

Solar Eclipse: सूर्यग्रहणाच्या वेळी कोणत्या गोष्टी करु नये?

Sanjay Raut : राज-उद्धव ठाकरे एकत्र आल्याच्या धक्क्यातून फडणवीस सावरले नाहीत, संजय राऊतांचा टोला

Bhagavad Gita: भगवद्गीतेच्या दहाव्या अध्यायात कोणती शिकवण मिळते?

...तर बाळाला फेकून देईन अन् मीही आत्महत्या करेल, PCMC अधिकाऱ्याला महिलेची धमकी|VIDEO

SCROLL FOR NEXT