team india yandex
Sports

Team India News: हा स्टार खेळाडू घेणार विराटची जागा! दिग्गजाने सुचवलं नाव

Virat Kohli Replacement: भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला आहे. दरम्यान त्याची जागा घेण्यासाठी कोण आहे, परफेरक्ट चॉईस?

Ankush Dhavre

भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेनंतर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला आहे. या दोघांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर, या दोघांची जागा कोण घेणार? अशी चर्चा सुरु आहे. विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला यायचा. त्याची जागा घेण्यासाठी शुभमन गिल आणि ऋतुराज गायकवाड यांना प्रबळ दावेदार मानलं जात आहे. दरम्यान भारतीय संघाचा माजी खेळाडू रॉबिन उथप्पा याने विराटची जागा घेण्यासाठी प्रबळ दावेदार कोण? याबाबत भाष्य केलं आहे.

रॉबिन उथप्पाने सोनी स्पोर्ट्सवर एका चर्चा सत्रात सहभाग घेतला होता. त्यावेळी तो म्हणाला की,'आपण दोघांनाही संघात का नाही ठेऊ शकत? कारण दोघेही शानदार फलंदाज आहेत. दोघांची टी-२० क्रिकेटमधील आकडेवारी सर्व काही सांगुन जाते. त्यामुळे तुम्ही दोघांपैकी एकाची निवड करु शकत नाही. जर तुम्ही सातत्यपूर्ण कामगिरीबद्दल बोलाल,तर ऋतुराज आघाडीवर आहे. तर दुसरीकडे शुभमन गिल हा पॉवरफुल खेळाडू आहे.'

तसेच तो पुढे म्हणाला की, ' या दोघांपैकी एकाची निवड करणं कठीण आहे. तसं पाहायचं झालं, तर दोघांनी एकत्र संघात खेळायला हवं. मला हेच विचारायचं आहे की, दोघं एकत्र का नाही खेळू शकत? कारण दोघेही ऑल फॉरमॅट खेळाडू आहेत.'

श्रीलंकेचे माजी खेळाडू रसेल आर्नोल्ड यांच्या मते, शुभमन गिल हा विराट कोहलीची जागा घेण्यासाठी योग्य पर्याय आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की, 'मी शुभमन गिलची निवड करेल, कारण त्याच्यात दमखम आहे. तो इतर भारतीय खेळाडूंपेक्षा वेगळा आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाफेडने मांडला कांदा खरेदीचा खेळ; पहिल्याच दिवशी फज्जा, बळीराजाची थट्टा

Malpua Recipe: घरच्या घरी बनवा खमंग आणि गोड मालपुआ, वाचा सोपी रेसिपी

Samir Choughule: समीर चौघुले घेऊन येतोय नात्यांचा गोडवा; 'साखर खाल्लेला माणूस'ची प्रदर्शन तारीख जाहीर

राज्यात बोगस शाळांचा सुळसुळाट; बोगस शाळांची यादी 'साम टीव्ही'च्या हाती

Fact Check : 200 च्या नोटेवर अब्दुल कलाम? व्हायरल फोटोमागचं सत्य काय? VIDEO

SCROLL FOR NEXT