afg vs nz twitter
क्रीडा

AFG vs NZ: बाईईई.. हा काय प्रकार? स्टेडीयमच्या वॉशरुममधून घेतलं जेवणासाठी लागणारं पाणी, PHOTO तुफान व्हायरल

Afghanistan vs New Zealand Test: अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यादरम्यान सुरु असलेल्या सामन्यात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Ankush Dhavre

ग्रेटर नोएडा क्रिकेट स्टेडियममध्ये अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील एकमेव कसोटी सामन्याचा थरार सुरु आहे. बीसीसीआयने अफगाणिस्तानला सामना होस्ट करण्यासाठी ग्रेटर नोएडाचं स्टेडियम उपलब्ध करुन दिलं आहे. हा कसोटी सामना ९ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर या कालावधीत होणार होता. मात्र या सामन्यातील तिसरा दिवस उजाडला असून अजूनपर्यंत टॉस झालेला नाही. दरम्यान या स्टेडियममधील काही धक्कादायक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ग्रेटर नोएडा स्टेडीयममधील कर्मचारी टॉयलेटच्या बेसिनमध्ये भांडी धुवत असल्याचं दिसून येत आहे. या धक्कादायक प्रकाराचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील सामन्याचा टॉसही झालेला नाही. त्यामुळे या सामन्याचं आयोजन वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी पाऊस पडला नसतानाही, मैदानातील काही भाग ओला असल्याने दिवसाचा खेळ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या दिवसाचा खेळही सुरुच झाला नाही. आता पावसामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळही रद्द केला जाणार आहे.

स्टेडियममधील धक्कादायक प्रकार

सोशल मीडियावर या स्टेडियममधील काही धक्कादायक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, केटरींग कर्मचारी स्टेडियमच्या वॉशरुममधून जेवणासाठी लागणारं पाणी घेताना दिसून येत आहेत.

या प्रकाराचे फोटो व्हायरल होताच, व्यवस्थापकांवर प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत. तर सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर मैदान ओलं असल्यामुळे सामन्याला सुरुवात होऊ शकलेली नाही. या स्टेडियमवर आधुनिक सुविधा उपलब्ध नाहीत, त्यामुळे कर्मचारी पंख्याच्या साहाय्याने मैदाना सुकवताना दिसून आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार ९००० रुपये; कसं? जाणून घ्या

Success Story: IIT मुंबईमधून शिक्षण, लाखोंची नोकरी नाकारली, अवघ्या २२ व्या वर्षी UPSC क्रॅक ;IAS सिमी करण यांची सक्सेस स्टोरी

Shukra Gochar 2024: नोव्हेंबर अखेरीस शुक्राचं नक्षत्र गोचर वाढवणार डोकेदुखी; आर्थिक हानी होण्याचा धोका

Air Pollution : राजधानीची हवा अत्यंत विषारी! शाळा बंद, वाहनांना बंदी, दिल्लीमध्ये अनेक निर्बंध

Weather Update : थंडीची चाहूल, कमाल अन् किमान तापमानात घट

SCROLL FOR NEXT