Brazil Footballer Ederson bizarre superstition saam tv
Sports

Ederson: भयंकर! गेल्या ८ वर्षांपासून एकच अंडरवेअर घालून खेळतोय फुटबॉल स्टार; कारण ऐकून धक्का बसेल

Brazil Footballer Ederson bizarre superstition: मॅन्चेस्टर सिटीचा गोलकीपर एडरसन गेल्या ८ वर्षांपासून प्रत्येक सामना एकाच अंडरवेअरमध्ये खेळत असल्याचा खुलासा करताच फुटबॉल चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण आलं आहे.

Surabhi Jayashree Jagdish

फुटबॉलच्या मैदानावर प्रत्येक खेळाडूची काही ना काही खास सवय असते. कोणी मैदानात उजवा पाय आधी टाकतो तर कुणी खास प्रार्थना करून खेळायला उतरतो. पण ब्राझीलचा स्टार गोलकीपर आणि मॅन्चेस्टर सिटीचा खेळाडू एडरसन याचा टोटका ऐकून अनेकजण चक्रावलेत. कारण गेल्या तब्बल ८ वर्षांपासून तो प्रत्येक सामना एकाच अंडरवेअरमध्ये खेळत असल्याचं त्याने स्वतः सांगितलं आहे.

मुलाखतीत केला खुलासा

२०१७ मध्ये मॅन्चेस्टर सिटी टीममध्ये सामील झालेल्या एडरसनने गेल्या वर्षी दिलेल्या एका मुलाखतीत याबाबत सांगितलं होतं. त्याने सांगितलं की, त्याचा फक्त एकच टोटका आहे आणि तो म्हणजे प्रत्येक सामना एकाच अंडरवेअरमध्ये खेळणं. विशेष म्हणजे, या काळात एडरसनने मॅन्चेस्टर सिटीसाठी अनेक मोठ्या लीग्समध्ये विजय मिळवत ट्रॉफी जिंकल्या आहेत.

BBC च्या ‘मॅच ऑफ द डे’ कार्यक्रमात बोलताना एडरसनने त्याच्या या विचित्र सवयीबद्दल सांगितलं. त्यानंतर मुलाखत घेणाऱ्यानेही उत्सुकतेपोटी त्याला विचारलं की, इतकी वर्षे वापरल्यामुळे त्या अंडरवेअरचा आकार बदलला नसेल का? यावर एडरसनने हसत 'नाही' असं उत्तर दिलं.

कशी आहे एडरसनची कारकिर्द?

एडरसनच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीकडे पाहिल्यास त्याने २०१८ मध्ये चिलीविरुद्ध ब्राझीलकडून डेब्यू केला होता. त्या सामन्यात ब्राझीलने ३-० असा विजय मिळवला होता. त्याची निवड २०२२ मध्ये कतारमध्ये झालेल्या फिफा वर्ल्डकपसाठीही करण्यात आली होती. त्या स्पर्धेत क्वार्टर फायनलपर्यंत पोहोचलेल्या ब्राझील टीमसाठी त्याने फक्त एक सामना खेळला होता.

ब्राझीलसाठी एडरसनने आतापर्यंत ३१ सामने खेळलेत. तर मॅन्चेस्टर सिटीकडून तो तब्बल २७६ सामन्यांमध्ये मैदानात उतरला आहे. मैदानावरील त्याच्या कामगिरी इतकाच त्याचा हा हटके टोटकाही आता चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : नाशिकमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद

अॅसिडीटी आणि उष्णता होईल झटक्यात कमी, उन्हाळ्यात एक ग्लास प्या थंडगार मठ्ठा, घरी बनवण्याची पद्धतही सोपी

सोन्या-चांदीचे भाव गगनाला; केंद्र सरकारच्या एका निर्णयामुळे बाजारावर मोठा परिणाम, कारण काय?

Mouth Cancer Symptoms: तोंडातल्या छोट्या फोडामुळे तरुणीला झाला Mouth Cancer, लगेचच वाचा महत्वाची माहिती

Shocking : पुणे हादरलं! पतीने पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकलं, १५ दिवस घरात कोंडून ठेवत केली मारहाण

SCROLL FOR NEXT