Shoaib malik with sania mirza saam tv news
Sports

Shoaib Malik: सानियासोबत घटस्फोट होताच शोएब मलिकच्या अडचणीत वाढ! मॅच फिक्सिंग प्रकरणात मोठी कारवाई

Shoaib Malik BPL: पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शोएब मलिकच्या अडचणीत वाढ होताना दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी त्याने पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत तिसऱ्यांदा विवाह बंधनात अडकला.

Ankush Dhavre

Shoaib Malik Match-Fixing Controversy: 

पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शोएब मलिकच्या अडचणीत वाढ होताना दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी त्याने पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत तिसऱ्यांदा विवाह बंधनात अडकला. दरम्यान सानिया मिर्झासोबत घटस्फोट झाल्यानंतर त्याचा वाईट काळ सुरु झाला आहे. मॅच फिक्सिंगच्या आरोपांनंतर त्याचा बांगलादेश प्रीमियर लीग स्पर्धेचा करार रद्द करण्याला आला आहे.

शोएब मलिक सध्या बांगलादेश प्रीमियर लीग स्पर्धा खेळतोय. या स्पर्धेत खेळत असताना त्याने एकाच षटकात ३ नो बॉल टाकले आहेत. या संशयास्पद गोलंदाजीनंतर त्याच्यावर मॅच फिक्सिंगचे आरोप करण्यात आले होते. Free Press Journal च्या माहितीनूसार, फॉर्च्युन बेरिसल संघाने शोएब मलिकचा करार तत्काळ रद्द केला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

तर झाले असे की, काही दिवसांपूर्वी झालेल्या सामन्यात फॉर्च्युन बेरिसल आणि खुलना टायगर्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या षटकातील सुरुवातीचे ४ चेंडू व्यवस्थित टाकले. त्यानंतर पुढील २ चेंडू टाकण्यासाठी त्याने ३ नो बॉल टाकले. हे टी-२० क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं आहे. यापूर्वी कुठल्याही फिरकी गोलंदाजाने एकाच षटकात ३ नो बॉल टाकले नव्हते. त्याच्या या कृत्यामुळे त्याच्यावर मॅच फिक्सिंगचे आरोप केले आहेत. (Latest sports updates)

ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वी अशा चर्चा सुरु होत्या की, शोएब मलिक बांगलादेश प्रीमियर लीग स्पर्धेत खेळणार नाहीये. तो दुबईला रवाना होणार असल्याची माहिती समोर आली होती. त्यावेळी तो वैयक्तिक कारणास्तव दुबईला जात असल्याची चर्चा सुरु होती.

सना जावेदसोबत अडकला विवाहबंधनात..

शोएब मलिक काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत विवाह बंधनात अडकला आहे. त्याने भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाला घटस्फोट झाला आहे. त्याने आपल्या तिसऱ्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत लग्न केला असल्याची माहिती दिली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vaidehi Parshurami: पैठणीत खुललं वैदेही परशुरामीचं सौंदर्य; सोज्वळ सौंदर्याने जिंकली चाहत्यांची मनं

Maharashtra News Live Update: दिवंगत पद्मश्री डॉ डी वाय पाटील यांना कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीने मानवंदना

Live Update : उद्धव ठाकरेंचे नेतृत्व कधीच वादात नव्हते, कपिल सिब्बल यांचा दावा; कोर्टातील सुनावणीचे क्षणाक्षणाचे अपडेट

Baba Vanga Prediction: 5 ते 9 ऑगस्टदरम्यान 'या' 5 राशींवर होणार पैशांचा वर्षाव? पाहा तुमची रास आहे का

KDMC Hospital : KDMC रुग्णालयात शिकाऊ डॉक्टरांचा हलगर्जीपणा! इंजेक्शनची सुई चिमुकल्याच्या कमरेत अडकली; धक्कादायक सत्य समोर

SCROLL FOR NEXT