Shoaib Akhtar Twitter/ @shoaib100mph
Sports

Shoaib Akhtar News: शोएब अख्तरचा मोठा खुलासा: बॉलिवूडच्या 'या' प्रसिद्ध चित्रपटात मिळाली होती लीड रोलची ऑफर

बॉलिवूडमध्ये काम करायची संधी मिळणं ही खूप मोठी गोष्ट असते. आता पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज, शोएब अख्तरने म्हटले आहे की, त्याला देखील बॉलिवूडमध्ये काम करायची संधी मिळाली होती.

Saam TV News

Shoaib Akhtar Bollywood News: शोएब अख्तर हा पाकिस्तान संघातील दिग्गज खेळाडूंपैकी एक आहे. क्रिकेटच्या मैदानावर अनके मोठ मोठे विक्रम करणारा हा गोलंदाज आता समालोचन करताना दिसून येत असतो.

तसेच अनेक क्रिकेटपटूंप्रमाणेच तो अनेकदा बॉलिवूडबद्दल असलेलं आपलं प्रेम व्यक्त करताना दिसून आला आहे. नुकताच त्याने मोठा खुलासा केला आहे. (Latest Sports Updates)

बॉलिवूडमध्ये काम करायची संधी मिळणं ही खूप मोठी गोष्ट असते. आता पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज, शोएब अख्तरने म्हटले आहे की, त्याला देखील बॉलिवूडमध्ये काम करायची संधी मिळाली होती.

द एक्स्प्रेस ट्रिब्यूनने दिलेल्या माहितीनुसार, शोएब अख्तरने म्हटले की, 'महेश भट्ट निर्देशित 'गॅंगस्टर' या चित्रपटात मला मुख्य भूमिका करण्यासाठी विचारपूस करण्यात आली होती.'

गतवर्षी शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) एका मोठा खुलासा केला होता. त्याच्या आयुष्यावर आधारित 'रावळपिंडी एक्सप्रेस: द रेसिंग अगेन्स्ट द ऑड्स' या चित्रपटाची शूटिंग लवकरच सुरु होणार असल्याचे त्याने म्हटले होते. मात्र या चित्रपटाची शूटिंग केव्हा सुरु होणार,याबाबत कुठलीही माहिती मिळाली नाहीये.

काही दिवसांपूर्वी पाकिस्तान क्रिकेटमध्ये एक मोठा बदल पाहायला मिळाला होता. मायदेशात इंग्लंड संघाकडून पराभूत झाल्यांनतर रमीज राजा यांची पाकिस्तान क्रिकेट बोर्डच्या चेअरमन पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यांच्या ऐवजी नमज सेठी यांना चेअरमनपद देण्यात आले आहे.

मात्र आता शोएब अख्तर देखील या पदावर जाण्याच्या तयारीत आहे. त्याने म्हटले आहे की, पाकिस्तान क्रिकेट बोर्डच्या चेअरमन पदावरून जाऊन त्याला सुपरस्टार्स खेळाडूंना संधी द्यायची आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT