Prithviraj Patil Maharashtra Kesari Saam TV
Sports

Saam Impact: तू चाल पुढं रे गड्या! Maharashtra Kesari पृथ्वीराज पाटीलवर बक्षीसांची खैरात

आज महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलला अनेकांनी बक्षीस देण्याचं जाहीर केले.

ओंकार कदम

सातारा : महाराष्ट्र केसरी (maharashtra kesari) किताब पटकाविलेल्या काेल्हापूरच्या (kolhapur) पृथ्वीराज पाटीलला (prithviraj patil) स्पर्धा आयाेजकांनी केवळ गदाच दिली राेख रक्कम दिली नाही अशी त्याने व्यक्त केलेली खंत सर्वांत प्रथम साम टीव्हीनं दाखविल्यानंतर काही वेळेतेच मल्ल पाटील याच्यावर बक्षीसांची खैरात सुरु झाली. राज्याचे विराेधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, राज्याचे गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई (shambhuraj desai), सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले (shivendraraje bhosale), खासदार उदयनराजे भाेसले (udayanraje bhosale) यांचे समर्थक माजी शिक्षण सभापती सुनील काटकर यांनी पृथ्वीराज पाटील यांस (satara) लाखाे रुपयांची बक्षीसं जाहीर केली आहेत. (maharashtra kesari prithviraj patil latest marathi news)

शिवेंद्रराजेंकडून पाच लाख

आमदार शिवेंद्रराजे भोसले म्हणाले पृथ्वीराजच्या नाराजीची दखल घेऊन सातारा- जावलीकर म्हणून मी तातडीने महाराष्ट्र केसरी विजेता पृथ्वीराज पाटील यांना पाच लाख रुपयांची रोख रक्कम जाहीर करीत आहे. ही रक्कम आम्ही तातडीने पृथ्वीराजला देऊ असे आमदार शिवेंद्रराजे यांनी नमूद केले.

शंभूराज देसाईंनी पाठविले दाेन लाख

महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलला बक्षीसाची रोख रक्कम न मिळाल्याची खंत आम्ही साम टीव्हीवर पाहिली. आम्ही पृथ्वीराज पाटील यांना (कै.) शिवाजीराव देसाई चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे दाेन लाख रुपयांचा बक्षीसाचा धनादेश पाठविल्याची माहिती गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी दिली.

उदयनराजेंच्या हस्ते बुलेट

महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यास केवळ गदाच मिळाली हे वृत्त साम टीव्हीनं दाखविले आणि श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज उर्फ दादा महाराज तालीम संघाने पृथ्वीराज पाटील यास खासदार उदयनराजे भाेसले यांच्या हस्ते बुलेट देणार आहाेत असं जाहीर केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सर्वात मोठी बातमी! 42 आमदारांवर कारवाई होणार? उच्च न्यायालयानं बजावली नोटीस, राजकीय वर्तुळात खळबळ

Baby Teeth Cleaning Tips: बाळाचे दात घासायला कधी सुरू करावे?

Crime: मौलवीकडून १४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, पीडितेने दिला बाळाला जन्म

Maharashtra Live News Update: सुनेत्रा पवारच राष्ट्रवादीच्या अध्यक्ष होणार : प्रफुल्ल पटेल

Famous Youtuber: प्रसिद्ध युट्यूबरच्या दोन्ही बायका एकाच वेळी प्रेग्नेंट; नेटकऱ्यांना बसला धक्का म्हणाले, 'हा पण ट्रेंड...'

SCROLL FOR NEXT