shardul thakur catch twitter
Sports

Shardul Thakur Catch: हार्दिकच्या बॉलवर शार्दुलचा बाऊंड्री लाईनवर भन्नाट कॅच! पांड्याच्या बर्थडेला दिलं खास गिफ्ट, VIDEO

Shardul Thakur: शार्दुल ठाकुरने या सामन्यात भन्नाट झेल टीपला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

Shardul Thakur Catch:

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यात शार्दुल ठाकुरने पकडलेली कॅच चर्चेचा विषय ठरतेय. या सामन्यात शार्दुल ठाकुरने सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असताना अफगाणिस्तानचा सलामीवीर फलंदाज रहमानुल्लाह गुरबाजचा एक भन्नाट झेल टिपला आहे. या झेलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.

तर झाले असे की, भारतीय संघ या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरला होता. त्यावेळी १३ वे षटक टाकण्यासाठी हार्दिक पंड्या गोलंदाजीला आला होता. हार्दिक पंड्याच्या या षटकातील चौथ्या चेंडूवर रहमानुल्लाहने गुरबाजने मोठा फटका खेळला. फटका खेळताच हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार असं वाटत होतं. मात्र सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या शार्दुल ठाकुरने हवेत उडी मारत भन्नाच झेल टिपला.

व्हिडिओ होतोय व्हायरल..

शार्दुलने हा भन्नाट झेल पकडून बड्डे बॉय हार्दिक पंड्याला गिफ्ट दिलं आहे.ज्यावेळी त्याने हा झेल पकडला त्यावेळी फलंदाज रहमाननुल्लाह गुरबाज देखील आश्चर्यचकीत झाला होता. रहमाननुल्लाह गुरबाजने इब्राहिम जारदानने २२ धावांची खेळी केली.

या दोघांनी मिळून ३२ धावांची भागीदारी केली. तर रहमत शाहने १६ धावांची खेळी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News : तीन दिवसानंतर मुंबईत आता पावसाची विश्रांती

Nandurbar : बस कंडक्टरकडून विद्यार्थिनींना शिवीगाळ; नंदुरबार बसस्थानकावरील प्रकार, कारवाईची मागणी

Beed : सरकारी वकिलाने कोर्टातच केली आत्महत्या, बीडमध्ये खळबळ

Diabetic patients: पांढरा भात खाल्ल्याने शरीरातील ब्लड शुगरचं काय होतं? मधुमेही रूग्णांनी भात खावा की नाही?

Mumbai Local : मुंबईकरांना मोठी भेट! नव्याकोऱ्या 268 एसी लोकल ट्रेन येणार, प्रवास गारेगार होणार!

SCROLL FOR NEXT