Shardul Thakur  Saam Tv
Sports

VIDEO: पत्नीबरोबर शार्दूल सैराट; झिंगाट गाण्यावर जबरदस्त धरला ताल

नुकताच शार्दुलचा हळदी समारंभातील व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

Shardul Thakur Haldi Ceremony: भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू शार्दूल ठाकूर सध्या क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. ऑस्ट्रेलियाविरुध्द सुरु असलेल्या कसोटी मालिकेसाठीही त्याला संधी देण्यात आली नाहीये.

लवकरच तो एका नव्या इनिंगची सुरुवात करणार आहे. २७ फेब्रुवारी रोजी तो मिताली पारूलकरसोबत विवाह बंधनात अडकणार आहे. २०२१ मध्ये दोघांचाही साखरपुडा मोठ्या उत्साहात पार पडला होता. आता तब्बल १५ महिन्यांनंतर दोघांचा विवाह सोहळा पार पडणार आहे. (Latest Sports Updates)

लग्नाची धामधूम सुरु झाली असून, त्याच्या मित्र मंडळींनी आणि कुटुंबातील सदस्यांनी लग्नसमारंभासाठी जमायला सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर देखील या विवाहाची चर्चा सुरु झाली आहे. नुकताच शार्दुलचा हळदी समारंभातील व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होतोय.

हळदीत शार्दुलचा हटके डान्स होतोय व्हायरल..

या हळदी समारंभात शार्दूल ठाकूर जोरदार डान्स करताना दिसून येत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, शार्दूल ठाकूरने पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. तो बँजोच्या तालावर मग्न होऊन भन्नाट डान्स करतोय.

त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

शार्दूल ठाकूरच्या हळदीच्या कार्यक्रमात स्टार फलंदाज श्रेयस अय्यर आणि मुंबईचा क्रिकेटपटू सिद्धेश लाडने देखील हजेरी लावली होती. दोघांनी मिळून या कपलसाठी गाणं देखील गायलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bunty Jahagirdar Firing Case: श्रीरामपूर हादरलं! जर्मन बेकरी बॉम्ब स्फोटातील आरोपी बंटी जहागिरदारची हत्या; हल्ल्याचा CCTV व्हिडिओ Viral

Maharashtra Live News Update: असलम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागिरदार याचा उपचारादरम्यान मृत्यू

बिबट्यासाठी ठेवला पिंजरा अन् अडकला भलताच प्राणी, पाहा VIDEO

Gadchiroli Crime: पती ठरला प्रेमात अडसर; प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा केला गेम, नंतर रचला अपघाताचा बनाव

Last Sunset 2025: सरत्या वर्षाचा सूर्यास्त; 2025 ला निरोप देतानाचे सुंदर फोटो पाहा

SCROLL FOR NEXT