Shardul thakur  Saam tv
Sports

IND Vs AUS 1st ODI: ऑस्ट्रेलियाची आता काही खैर नाही! टीम इंडियाला एकहाती सामना जिंकून देणारा खेळाडू परतलाय

Indian Team Playing 11: आज भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला वनडे सामना पार पडणार आहे

Ankush Dhavre

Shardul Thakur: आज भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला वनडे सामना पार पडणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडणार आहे.

हा सामना जिंकण्यासाठी हार्दिक पंड्या मजबूत प्लेइंग ११ सह मैदानात उतरणार आहे. दरम्यान भारतीय संघात असा एक खेळाडू आहे, जो एकटाच ऑस्ट्रेलिया संघावर भारी पडू शकतो.

ऑस्ट्रेलियाविरुध्द होणाऱ्या सामन्यात भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू शार्दूल ठाकूर भारतीय संघासाठी मॅचविनर ठरू शकतो. कारण हे त्याचे होम ग्राउंड आहे. तसेच या खेळपट्टीवरून स्विंग गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांना मदत मिळत असते. (Latest sports updates)

त्यामुळे शार्दूल ठाकूर हा ऑस्ट्रेलिया संघाची अडचण वाढू शकतो. मात्र या सामन्यात संधी मिळते की नाही हे पाहन महत्वाचं ठरणार आहे.

शार्दूल ठाकूर सुरवातीच्या आणि अंतिम षटकांमध्ये गोलंदाजी करण्यासाठी तरबेज आहे.

त्यामुळे मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज सारख्या गोलंदाजांचा भर कमी होऊ शकतो. त्याच्या गोलंदाजीत गती आहे यासह तो चेंडू हवेत स्विंग करू शकतो.

अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:

शुभमन गिल, ईशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पंड्या (कर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी आणि शार्दूल ठाकूर.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ITR Filing 2026: 31 जुलैपर्यंत ITR भरला नाही तर मोठा आर्थिक फटका; प्रत्येक करदात्याने ही बातमी एकदा वाचाच

Bollywood Actress Wedding : शुभमंगल सावधान! प्रसिद्ध अभिनेत्री चढली बोहल्यावर; नवऱ्यासाठी केली खास पोस्ट, पाहा लग्नाचे PHOTOS

Maharashtra News Live Update: यंदाच्या पावसाळ्यात पंचगंगा नदी दुसऱ्यांदा पात्राबाहेर

पाण्याचा एक थेंबही न घालता बनवा कुरकुरीत 'खेकडा भजी', चव एवढी भारी की न खाणारेही खातील

Mumbai : बोगस DCP ला करायचा मदत, मुंबईत PSI ला बेड्या, चोर-पोलिसाचं बिंग असं फुटले

SCROLL FOR NEXT