shane warne  saam tv
Sports

Shane Warne Death Covid Vaccine :कोविडच्या लसीमुळे झाला शेन वॉर्नचा मृत्यू ? डॉक्टरांनी केला मोठा खुलासा

Shane Warne: आता वर्षभरानंतर त्याच्या मृत्यूबाबत एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.

Ankush Dhavre

Shane Warne Death: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू शेन वॉर्नचा गेल्या वर्षी मार्च महिन्यात मृत्यू झाला होता. ही बातमी समोर येताच क्रिकेट विश्व हादरून गेलं होतं. ४ मार्च २०२२ रोजी थायलँडच्या एका हॉटेलमधील खोलीत तो मृतावस्थेत असल्याचे दिसून आले होते.

शेन वॉर्न आपल्या मित्रांसह सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी घेण्यासाठी गेला होता. त्यावेळी हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला होता. मात्र आता वर्षभरानंतर त्याच्या मृत्यूबाबत एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.

एका अहवालात असं म्हटलं गेलं आहे की, शेन वॉर्नने कोरोनापासून बचाव करण्यासाठी जी लस घेतली होती, ती लस रक्तवाहिन्यासंबंधी आजारांना प्रोत्साहन देते. ही लस घेतल्याच्या ९ महिन्यानंतर शेन वॉर्नचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. भारतीय वंशाचे ब्रिटीश कार्डिओलॉजिस्ट आणि ऑस्ट्रेलियन डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की, ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूला ९ महिन्यांपूर्वी COVID mRNA लस दिली गेली होती. हीच लस त्याच्या मृत्यूचं कारण असू शकते. (Latest sports updates)

ऑस्ट्रेलियन मेडिकल प्रोफेशनल्स सोसाइटी (AMPS)चे अध्यक्ष कार्डिओलॉजिस्ट डॉ. असीम मल्होत्रा यांनी म्हटले की, 'माजी खेळाडूचा ५२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होणं ही सामान्य गोष्ट आहे. तसेच अलीकडच्या काळात त्याची जीवनशैली देखील बदलली होती. त्याचं वजन वाढलं होतं, तो धूम्रपान देखील करायचा. Pfizer च्या mRNA COVID-19 लसीचे दोन डोस घेतल्यानंतर त्याच्या धमन्यांमधील काही सौम्य प्लेक्स वेगाने वाढले असण्याची शक्यता वर्तवली आहे. माझे काही पेशंट्स आहेत त्यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. माझ्या वडिलांचा मृत्यू देखील असाच झाला आहे.'

याबाबत बोलताना माजी क्रिकेटपटू दिमित्री मस्करेन्हास म्हणाले की,' शेन हा माझा खूप चांगला मित्र होता. मला या गोष्टीचं आश्चर्य होत आहे की, त्याला वाचवता आलं असतं. जर त्याने कोविडची लस घेतली नसती तर तो जिंवत असता.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : अपघाताचा थरार! म्हशीला वाचवताना ५ वाहनांची जोरदार टक्कर, ४ जणांचा जागीच मृत्यू; रस्त्यावर मृतदेहाचा खच

गुप्तधनाचा हंडा काढून देतो म्हणणाऱ्या भोंदू बाबाकडून कोट्यवधींची फसवणूक|VIDEO

Vanjari Community: महाराष्ट्रभर वंजारी समाजाचे ST प्रवर्गातील आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन

Nashik Crime: फिरण्याच्या बहाण्यानं मुंबईत आणलं; बाथरुममधील तिचे फोटो काढले,नंतर...

School Firing : शाळेत अंदाधुंद गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १२ जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT