Ask SRK: आयपीएल २०२३ स्पर्धेत युवा खेळाडूंचा जलवा पाहायला मिळाला होता. ज्यात सर्वाधिक चर्चेत राहिलेलं नाव म्हणजे युवा फलंदाज रिंकू सिंग. त्याने कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व करताना दमदार कामगिरी केली होती.
ज्या ज्या वेळी संघ अडचणीत असायचा त्यावेळी हा फलंदाज येऊन तुफान फटकेबाजी करायचा आणि संघाला विजय मिळवून द्यायचा. रिंकूची फलंदाजी पाहून कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मालक शाहरुख खान देखील भलताच खुश झाला होता.
रविवारी(२५ जून) #AskSRK मध्ये जेव्हा शाहरुख खानला रिंकू सिंगबद्दल प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी शाहरुख खानने भन्नाट उत्तर दिल्याचे पाहायला मिळाले आहे.
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो #AskSRK या हॅशटॅगचा वापर करून विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देत असतो. यादरम्यान शाहरुख खानला रिंकू सिंगबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. एका युजरने विचारले होते की, ' KKR चा पोरगा रिंकू सिंग कसा आहे.' यावर शाहरुख खानने भन्नाट उत्तर दिलं आहे.
शाहरुख खानने या ट्विटला रिट्विट करत लिहिले की , 'रिंकू पोरगा नाहीतर बाप आहे..' शाहरुख खानचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागले आहे. आयपीएल २०२३ स्पर्धेत रिंकू सिंग प्रचंड चर्चेत राहिला होता.
त्याने गुजरात टायटन्स संघाविरुद्व झालेल्या सामन्यात एकाच षटकात सलग ५ षटकार मारून संघाला विजय मिळवून दिला होता. या खेळीनंतर शाहरुख खान देखील प्रचंड खुश झाला होता. तर या खेळीनंतर स्वतः शाहरुख खानने रिंकू सिंगला कॉल केला होता. ज्याचा खुलासा रिंकू सिंगने केला होता. (Latest sports updates)
वेस्ट इंडिजविरुद्ध मिळणार संधी?
येत्या जुलै महिन्यात भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यावर होणाऱ्या टी -२० मालिकेसाठी रिंकू सिंगला भारतीय संघात संधी दिली जाऊ शकते. रिंकू सिंगने १४ सामन्यांमध्ये ४७४ धावा केल्या होत्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.