suresh raina with shahid afridi google
Sports

Shahid Afridi: शाहिद आफ्रिदीच्या सांगण्यावरून रैनाने ती पोस्ट डिलीट केली? काय आहे संपूर्ण प्रकरण?

Shahid Afridi - Suresh Raina: शाहिद आफ्रिदीच्या सांगण्यावरून सुरेश रैनाने ते ट्विट डिलीट केलं होतं. असा दावा शाहिद आफ्रिदीने केला आहे.

Ankush Dhavre

पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने सुरेश रैनासोबत झालेल्या सोशल मीडयावरील वादावर अखेर मौज सोडलं आहे. ज्यावेळी शाहिद आफ्रिदीची आयसीसी टी -२० वर्ल्डकप स्पर्धेसाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली होती. त्यावेळी पाकिस्तानी पत्रकाराने एक्सवर पोस्ट शेअर करत रैनाला डीवचलं होतं. त्यानंतर रैनानेही त्याला सडेतोड उत्तर दिलं होतं. त्यानंतर शाहिद आफ्रिदीने रैनाला पोस्ट डिलीट करायला सांगितलं होतं. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

पाकिस्तानी पत्रकाराने एक्स पोस्ट शेअर करत लिहिले होते की, ' आयसीसीने शाहिद आफ्रिदीची टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून निवड केली आहे, हॅलो सुरेश रैना?..' या पोस्टवर रिप्लाय देत सुरेश रैनाने लिहिले की, ' मी आयसीसीचा ॲम्बेसेडर नाहीये, पण माझ्या घरी २०११ वर्ल्डकपची ट्रॉफी आहे. मोहालीत झालेला सामना लक्षात आहे ना? ' यानंतर शाहिद आफ्रिदीने आपल्या युट्यूब चॅनेलवर बोलताना असा दावा केली की, मी स्वतः सुरेश रैनाला हे ट्विट डिलीट करण्याची विनंती केली होती.

आपल्या युट्यूब चॅनेलवर बोलताना शाहिद आफ्रिदी म्हणाला की, ' सुरेश रैना आणि मी अनेक क्रिकेटचे क्षण शेअर केले आहेत. तो उत्तम क्रिकेटपटू आणि चांगला माणूस आहे. कधीकधी विनोदही व्हायचे. सोशल मीडियावर मी त्याचे पोस्ट पाहिल्यानंतर, मी त्याच्याशी चर्चा केली. लहान भावाप्रमाणे परिस्थिती समजून घेतली. त्यानंतर तो पोस्ट डिलीट करण्यासाठी तयार झाला. हे सर्व ठीक आहे. अशा गोष्टी होत राहतात.

आयसीसी वनडे वर्ल्डकप २०११ स्पर्धेतील उपांत्य फेरीतील सामन्यात भारत - पाकिस्तान संघ आमने सामने होते. त्यावेळी भारतीय संघाचे कर्णधारपद एमएस धोनीकडे होते. तर शाहिद आफ्रिदी पाकिस्तानचा कर्णधार होता. त्यावेळी पाकिस्तानला पराभूत करण्यात सुरेश रैनानेही मोलाची भूमिका बजावली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Impact: भ्रष्ट अधिकाऱ्यांना आता दे धक्का! 314 अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या रडारवर

Buldhana News: रस्त्यावरच महिलेची प्रसूती, मदतीसाठी कुणीच येईना; रुग्णालयाने नकार दिला, शेवटी...

रात्री झोपताना कंबर आणि पायाचा घोटा दुखतायत? तुमच्या दैनंदिन वापरातील 'ही' वस्तू ठरू शकते कारण

Maharashtra News Live Update: चितेगाव टोलनाक्याजवळ दोन कारची जोरदार धडक; जीवितहानी टळली

Crime: रायगड हादरले! १६ वर्षीय मुलीवर बलात्कार, मित्रानेच केलं भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT