Sara Tendulkar saam tv
Sports

Sara Tendulkar : 'हे माझ्या प्रेमासाठी...' सारा तेंडुलकरने खरेदी केला क्रिकेटचा संघ

Sara Tendulkar News : आयपीएल सुरु असतानाच सारा तेंडुलकरने गुड न्यूज दिली आहे. साराने ग्लोबल ई-क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये मुंबईचा संघ विकत घेतला आहे. याची अधिकृत घोषणा साराने इन्स्टाग्रामवर दिली.

Yash Shirke

Sara Tendulkar News Update : भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर हा जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक आहे. सचिनला त्याचे चाहते क्रिकेटचा देव म्हणतात. सचिनच्या कुटुंबाचे देखील क्रिकेटशी खास नाते आहे. त्याचा मोठा भाऊ देखील क्रिकेट खेळायचा. सचिनचा मुलगा अर्जुन वेगवान गोलंदाज आहे. अशातच सचिनच्या लेकीने, सारा तेंडुलकरने क्रिकेटच्या विश्वामध्ये पाऊल ठेवले आहे. तिने एक क्रिकेट टीम खरेदी केली आहे.

सारा तेंडुलकर सोशल मीडियावर खूप जास्त सक्रीय आहे. तिने नुकतीच एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये साराने मुंबईशी संबंधित एक क्रिकेटचा संघ विकत घेतल्याचे म्हटले होते. सारा तेंडुलकरने ग्लोबल ई-क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये मुंबईची फ्रँचायझी खरेदी केली आहे. हा संघ विकत घेण्यामागील कारण देखील साराने सांगितले आहे.

'किक्रेट हा खेळ माझ्या आणि माझ्या कुटुंबासाठी अविभाज्य घटक आहे. ई-स्पोर्ट्समध्ये क्रिकेटची क्षमता उत्साहित करणारी आहे. मुंबई फ्रँचायझीची मालकी हे माझे एक स्वप्न सत्यात उतरले आहे. यामुळे क्रिकेट आणि मुंबई या दोन्ही गोष्टींवरील प्रेम एक झाले आहे. या प्रतिभावान संघात सामील होण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. लोकांचे मनोरंजन होईल अशी फ्रँचायझी आम्ही तयार करु', असे वक्तव्य सारा तेंडुलकरने केले आहे. काही दिवसांपूर्वी साराची सचिन तेंडुलकर फाउंडेशन म्हणजेच एसटीएफच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

'मुंबई फ्रँचायझीची मालकीण म्हणून सारा तेंडुलकरचे लीगमध्ये सामील होणे हा जीईपीएलसाठी महत्त्वपूर्ण क्षण आहे. त्यांची उपस्थिती आणि चाहत्यांशी असलेले घनिष्ठ संबंध यांमुळे लीगचा दर्जा नक्कीच वाढेल', असे वक्तव्य जीईपीएलचे सीईओ आणि लीग कमिश्नर रोहित पोटफोडे यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

Honey And Warm Water Benefits: कोमट पाण्यात मध मिक्स करून पिण्याचे फायदे काय?

Gautami Patil : गौतमी पाटीलचा आजवरचा सर्वात बोल्ड अन् ग्लॅमरस अंदाज, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'कडक'

"ओमराजे परत जा!" MPSC आंदोलनात शिंदेंच्या खासदाराविरोधात जोरदार घोषणाबाजी, वातावरण तापले

SCROLL FOR NEXT