sanju samson  twitter
क्रीडा

Gentleman Sanju Samson: कॅप्टन असावा तर असा! Sanju Samson च्या 'त्या' कृत्याने करून दिली विराट - धोनीची आठवण

Ankush Dhavre

KKR VS RR IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धेत गुरुवारी रोमांचक सामना पार पडला. कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाला विजयासाठी १५० धावांची गरज होती.

या धावांचा पाठलाग करताना सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वालने तुफान फटकेबाजी करत ९८ धावांची खेळी केली आणि संघाला सामना जिंकून दिला. त्याचे शतक अवघ्या २ धावांनी हुकले.

दरम्यान शेवटी कर्णधार संजू सॅमसनने मन जिंकणारे कृत्य केल्याचे पाहायला मिळाले आहे.

तर झाले असे की, १३ वे षटक सुरू असताना शेवटच्या चेंडूवर राजस्थान रॉयल्स संघाला विजयासाठी ३ धावांची गरज होती. त्यावेळी यशस्वी जयस्वाल ९४ वर तर संजू सॅमसन ४८ धावांवर फलंदाजी करत होता. त्यावेळी गोलंदाजी करत असलेल्या सुयश शर्माने वाईड चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला.

मात्र संजू सॅमसनने चपळाई दाखवत हा चेंडू पॅडने अडवला. त्यामुळे हा डॉट चेंडू राहिला. संजू सॅमसन त्या चेंडूवर शॉट मारून आपले अर्डशतक पूर्ण करू शकत होता. मात्र त्याने असं केलं नाही. जर हा चेंडू सुटला असता तर, तो यष्टिरक्षकाच्या हातातही आला नसता. मात्र यशस्वीचं शतक पूर्ण व्हावं म्हणून त्याने तो चेंडू डिफेन्स केला.

यशस्वीला शतक पूर्ण करण्यासाठी ४ धावांची गरज होती. त्यावेळी संजू सॅमसनने त्याला षटकार मार.. असे म्हटले. यशस्वीने प्रयत्नही केला. मात्र त्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. ४ धावा मारत त्याने संघाला विजय मिळवून दिला मात्र त्याचे शतक २ धावांनी अपूर्ण राहिले. (Latest sports updates)

करून दिली विराट - धोनीची आठवण...

अशीच घटना २०१४ मध्ये झालेल्या टी -२० वर्ल्ड कप स्पर्धेतही घडली होती. दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात विराट कोहकी ४३ चेंडू खेळून ६८ धावांवर फलंदाजी करत होता. या खेळीसह त्याने भारतीय संघाला एकहाती विजय मिळवून दिला होता. भारतीय संघ विजयाच्या टोकावर असताना एमएस धोनी फलंदाजी करण्यासाठी मैदानावर आला होता.

त्यावेळी धोनीने १९ व्या षटकातील शेवटचा चेंडू डिफेन्स करत विराटला विनिंग शॉट मारण्याची संधी दिली होती. धोनीने युवा खेळाडू विराटचा आत्मविश्वास वाढवला होता. तोच वारसा आता संजू सॅमसन पुढे घेऊन जात आहे.

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने १४९ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना यशस्वी जयस्वाल ९८ आणि संजू सॅमसनच्या ४८ धावांच्या जोरावर राजस्थान रॉयल्स संघाने ९ गडी राखून विजय मिळवला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut Press Conference : जागा वाटपावर संजय राऊतांची प्रतिक्रिया; सांगितले मविआच्या जागांचे सूत्र

Gold Silver Price: सोनं ७८००० वर पोहचलं; दिवाळीआधीच सोने-चांदीला झळाळी

Dustbin Scam : नवी मुंबई मनपामध्ये डस्टबिन घोटाळा; काम न करता जुने फोटो दाखवून लाखोंचा भ्रष्टाचार

Karmayogi Abasaheb: सोलापुरात ५४ वर्षे आमदार, लोकांसाठी झटला, सर्वसामान्य नेत्याची कथा मोठ्या पडद्यावर! चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Priyanka Chopra Daily Skin Care: वयाच्या ४२ व्या वर्षीही कशी राहिल त्वचा चमकदार? जाणून घ्या प्रियांका चोप्राच्या ब्युटीचं सिक्रेट

SCROLL FOR NEXT