Sam Curran comment on Indian fans before semi final saam tv
Sports

IND vs ENG Semi final: सेमीफायनलआधी टीम इंडियाला इशारा, इंग्लंडचा खेळाडू म्हणतो वानखेडेवरील फॅन्सला शांत करू

Sam Curran comment on Indian fans before semi final: टी-२० वर्ल्डकप २०२६ च्या सेमीफायनलपूर्वी इंग्लंडचा स्टार ऑलराऊंडर सॅम करनने भारतीय चाहत्यांबाबत मोठं विधान केलं आहे. यामुळे चाहत्यांना पॅट कमिन्सची आठवण आली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

२०२६ च्या टी-२० वर्ल्डकपची दुसरी सेमीफायनल उद्या म्हणजेच ५ मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात भारत विरूद्ध इंग्लंड एकमेंकांच्या समोर येणार आहेत. दरम्यान या सामन्यापूर्वी इंग्लंडचा स्टार ऑलराऊंडर सॅम करनने भारतीय चाहत्यांना उद्देशून एक मोठं विधान केलं आहे.

वानखेडे स्टेडियम म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो उत्साही आणि आनंदाने गोंगाट करणाचा चाहता वर्ग. सेमीफायनलमध्ये भारतीय फॅन्स टीम इंडियासाठी चीअर अप करतील यामध्ये काहीच वाद नाही. उद्याच्या सेमीफायनलमध्येही चाहत्यांचा जल्लोष पाहायला मिळणार आहेत. दरम्यान भारताचा पराभव करत फॅन्सना शांत करण्यावर सॅमने भाष्य केलंय.

सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत बोलताना सॅम करन म्हणाला, 'हे एक भव्य आणि आयकॉनिक स्टेडियम आहे. मला खात्री आहे की, गुरुवारी रात्री या स्टेडियमवर भयाण शांतता पसरेल. एक तरुण क्रिकेटपटू म्हणून तुम्ही भारताविरुद्ध वर्ल्डकपची सेमीफायनल खेळण्याचं स्वप्न पाहता. या मैदानावरील पीच सहसा फलंदाजीसाठी चांगली असतं आणि मैदान लहान असतं, म्हणून मला हाय-स्कोअरिंग सामना अपेक्षित आहे.'

पॅट कमिन्सची आठवण

२०२३ च्या वनडे वर्ल्डकप फायनलपूर्वी पॅट कमिन्सने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये १,००,००० हून अधिक भारतीय फॅन्सना शांत करणार असल्याचं सांगितलं होतं. कमिन्सने फायनलपूर्वी स्टेडियममधील गर्दीला शांत करणार असल्याची इच्छा व्यक्त केली होती. दरम्यान विराट कोहलीची विकेट घेऊन त्याची इच्छा पूर्ण केली होती.

उद्या वानखेडेवर इंग्लंड एका मजबूत टीम इंडियाचा सामना करणार आहे. मात्र करन कोणत्याही प्रेशरखाली नसल्याचं दिसतंय. तो म्हणाला की, इंग्लंडच्या टीमला भारतीय परिस्थितीत खेळण्याची सवय आहे. टीमच्या बहुतेक खेळाडूंनी भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय सामने खेळलेत. आणि आयपीएलमध्येही भाग घेतला आहे.

करनने पुढे सांगितलं की, आम्हाला एक परफेक्ट गेम खेळायचा आहे. भारत एक उत्तम टीम आहे. परंतु आम्ही पूर्णपणे तयार आहोत. आम्ही श्रीलंकेमध्ये नंतर कोलकातामध्ये सामने खेळलोय. परंतु सगळीकडेच परिस्थिती वेगळी होती. मात्र आम्ही त्यांच्याशी चांगल्या पद्धतीने जुळवून घेतलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पार्थ पवार राज्यसभेसाठी दाखल करणार उमेदवारी अर्ज, पाहा व्हिडिओ

Maharashtra Live News Update: नाशिकच्या आदिवासी विकास भवनामध्ये शेकडो विद्यार्थ्यांचा ठिय्या

Summer Hair Care Tips: उन्हाळ्यात केसांची काळजी कशी घ्याल?

BMC Recruitment: बृहन्मुंबई महापालिकेत भरती! ९००० पदांसाठी घोषणा; कधी होणार प्रक्रिया?

Eknath Shinde: '...ते एकनाथ शिंदेंचे विमान पाडणार होते', राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT