Salman Ali Agha Video Saam tv
Sports

Salman Ali Agha Video: भारत-पाकिस्तान सामन्यात विपरीत घडलं; लाइव्ह सामना पाहणाऱ्यांच्या काळजाचा चुकला ठोका

Salman Ali Agha Video: रवींद्र जडेजाच्या धारदार चेंडूवर पाकिस्तानी फलंदाज सलमान अली आगा दुखापतग्रस्त झाला. सलमानच्या नाकाला चेंडू लागताच रक्ताची धार उडाली.

Vishal Gangurde

Salman Ali Agha Video:

कोलंबोच्या प्रेमदासा मैदानात भारत विरुद्ध पाकिस्तानचा हायव्हॉल्टेज सामना सुरू आहे. टीम इंडियाने पाकिस्तानला ३५७ धावांचं आव्हान दिलं आहे. सामन्यात पाकिस्तानची पडझड सुरूच असल्याचे दिसत आहे. याचदरम्यान, रवींद्र जडेजाच्या धारदार चेंडूवर पाकिस्तानी फलंदाज सलमान अली आगा दुखापतग्रस्त झाला. सलमानच्या डोळ्याजवळ चेंडू लागताच रक्ताची धार उडाली. (Latest Marathi News)

आशिया कप स्पर्धेतील सुपर-४ मधील भारत विरुद्ध पाकिस्तानचा हायव्हॉल्टेज सामना झाला. या सामन्यात टीम इंडियाने मोठा विजय मिळवला. मात्र, या सामन्यात काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. या सामन्यात पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू सलमान अली आगा याच्या डोळ्याजवळ चेंडू लागला.

रवींद्र जडेजाने टाकलेला चेंडू थेट सलमानच्या चेहऱ्यावर डोळ्याजवळ लागल्याने रक्ताची धार उडाली त्यानंतर तातडीने सलमानच्या डोळ्याच्या खाली लागल्याने प्रथमोचार करण्यात आले. प्रथमोचार झाल्यानंतर सलमान पुन्हा खेळण्यास तयार झाला.

तत्पूर्वी, सलमान अली आगा हा फिरकीपटू रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर हेल्मेट न घालता फलंदाजी करत होता. त्यामुळे चेंडू त्याच्या डोळ्याजवळ लागला. त्याने हेल्मेट घातले असते तर ही घटना टळली असती. चेंडू डोळ्याजवळ लागल्यानंतर सलमानने हेल्मेट घालून फलंदाजीला सुरुवात केली.

२३ धावांवर झाला बाद

भारत विरुद्ध पाकिस्तान या हायव्हॉल्टेज सामन्यात सलमान अलीला फारशी जादू दाखवता आली नाही. पाचव्या स्थानावर फलंदाजी करण्यासाठी उतरत त्याने ३२ चेंडूचा सामना केला. त्याने ७१.८७ सरासरीने २३ धावा कुटल्या. फलंदाजी करताना सलमानने दोन चौकार लगावले. सलमानला कुलदीप यादवने पायचित केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aam Papad Recipe : बाजारात मिळतो तसा 'आम पापड' घरीच बनवा, मुलांसाठी आंबट-गोड चवीचा खाऊ १० मिनिटांत तयार

Amravati: सख्ख्या बहीण-भावासह चौघांचा तलावात बुडून मृत्यू, गावावर शोककळा

FD Calculation: महिन्याला ₹१०,००० हजाराचं व्याज हवयं? वाचा एफडीचं कॅलक्युलेशन

Summer Wedding Fashion: उन्हाळ्यातील लग्नसराईसाठी काय घालायचा? जड लेहेंगा सोडा, ट्राय करा हे कम्फर्टेबल ड्रेस

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणातील पीडित मुलीचे आई-वडील मूक मोर्चात सहभागी

SCROLL FOR NEXT