sachin tendulkar Saam Tv
Sports

Sachin Tendulkar: वनडे क्रिकेटमध्ये सचिनने गोलंदाजीत केलाय इतिहास; एकाही गोलंदाजाला तोडता आला नाहीये 'हा' विक्रम

sachin tendulkar: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे क्रिकेटमधील अनेक विक्रम आपल्या सर्वांना माहितीये. एकदिवशीय क्रिकेटमध्ये सचिनने फलंदाजीत अनेक विक्रम केलेत पण सचिनने गोलंदाजीत एक विक्रम केलाय जो कोणत्याच गोलंदाजाला मोडता आला नाहीये, काय आहे हा विक्रम

Bharat Jadhav

Sachin Tendulkar Record In One Day Cricket:

सचिन तेंडुलकर हा सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे, हे सर्वांना माहितीये. त्याच्या फलंदाजीमुळे त्याला मास्टर ब्लास्टर हे नाव देण्यात आलंय. सचिन १०० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतक करणारा एकमात्र खेळाडू आहे. पण तुम्हाला माहितीये सचिन तेंडुलकरने फलंदाजीसह गोलंदाजीत एक मोठा विक्रम केलाय. त्याचा हा विक्रम अजूनपर्यंत कोणत्याच गोलंदाजाला तोडता आला नाहीये. असा कोणता विक्रम आहे हे आपण जाणून घेऊ... (Latest News)

हा विक्रम करणारा सचिन एकमात्र गोलंदाज आहे. वनडे क्रिकेटमध्ये अखेरच्या षटकात कमी धावा दिल्या आहेत. पराक्रम सचिनने एकदा नाही तर दोनदा केलाय. दिग्गज तेंडुलकरने हा विक्रम पहिल्यांदा १९९३ मध्ये आणि १९९६ मध्ये दुसऱ्यांदा केला होता. पहिला विक्रम १९९३ मध्ये झालेल्या वर्ल्ड कपच्या उपात्य सामन्यात केला होता. हा सामना दक्षिण आफ्रिकेच्या संघाविरुद्धात झाला होता.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाला विजयासाठी ६ धावा लागत होत्या. त्यावेळी सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) अखेरचे षटक टाकलं आणि भारताचा ४ धावांनी विजय मिळून दिला.त्यानंतर १९९६ दुसऱ्यांदा असा विक्रम सचिनने टायटन कपमध्ये झालेल्या सामन्यात केला होता. हा सामना आस्ट्रेलिया संघाच्याविरुद्ध खेळला गेला होता. यातही सचिनने ६ धावा वाचवत टीम इंडियाला (Team India) विजय मिळवून दिला होता. सचिन तेंडुलकर असे भारतीय गोलंदाज बनला ज्याने एकाच स्थितीत दोन वेळा फाइव विकेट हॉल केलं होतं.

१९९८ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानच्याविरुद्ध खेळलेल्या सामन्यात ५ विकेट हॉल केले होते. सचिन तेंडुलकर असा खेळाडू ठरला ज्याने कमी वयात हा विक्रम केला होता. हा विक्रम केला त्यावेळी सचिन तेंडुलकर अवघा १७ वर्षांचा होता. सचिनने कसोटी, एकदिवसीय क्रिकेट, टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह ६६४ सामन्यांमध्ये ४१६ डावांमध्ये गोलंदाजी करताना ४६.५३ च्या सरासरीने एकूण २०१ विकेट घेतल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: संगमेश्वर माखजन बाजारपेठेला पुन्हा एकदा पुराचा धोका

Ganeshotsav 2025: यंदा गणेशोत्सव कधी आहे? जाणून घ्या तारीख

Khopoli Ghat Traffic : खोपोली घाटात १०० हून अधिक कार थांबल्या, जाणून घ्या धक्कादायक कारण

Mobile Deals: ३००० पेक्षा कमी किंमतीत मोबाईल फोन, YouTube आणि JioHostar पाहण्याची देखील सुविधा

Pune: काय रे तुम्हाला मस्ती आली आहे का? लोखंडी रॉड अन् दगडाने मारहाण; पुण्यात भरचौकात टोळक्यांचा राडा, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT