Sachin Tendulkar Saam TV
Sports

सचिन तेंडुलकरचा क्युट व्हिडिओ होतोय व्हायरल, शेवट बघितल्यानंतर म्हणाल, Wow!

सचिन मात्र नेहमी त्याच्या खेळासाठी चर्चेत राहिला.

साम टिव्ही ब्युरो

Sachin Tendulkar Video : भारतीय क्रिकेटला नव्या उंचीवर नेऊन ठेवण्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मोलाचा वाटा आहे. सचिनने त्याच्या कारकिर्दीत अनेक विश्वविक्रम आपल्या नावे केले. मात्र क्रिकेटर्स म्हटलं की, ते नेहमीच चांगल्या-वाईट अशा कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रकाशझोतात राहतात.

सचिन मात्र नेहमी त्याच्या खेळासाठी चर्चेत राहिला. निवृत्तीनंतरही तो एक जेंटलमन सारखं आयुष्य जगतोय. जास्तीत जास्त वेळ आपल्या कुटुंबियांना देत आहे. (Latest Marathi News)

सचिन त्याच्या आयुष्यातील चांगले क्षण नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या फॅन्ससोबत शेअर करत असतो. सचिन एक उत्तम फॅमिली मॅन आहे, हे तो त्याच्या कृतीतून नेहमीच दाखवत आलाय. असाच एक व्हिडीओ सचिनने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यात तो एका हॉटेलमध्ये पत्नी अंजली तेंडुलकरसोबत दिसत आहे.

सचिनने व्हिडीओला Watch till end असं कॅप्शन दिलं आहे. सचिनने सुरुवातीला त्याच्या पुढ्यातील ताटावर जे लिहिलंय ते सर्वांना दाखवलं. त्यावर लिहिलंय की, 'You never know who you will meet over a slice' त्यानंतर सचिनने पत्नी अंजली तेंडुलकरचे एक्सप्रेशन दाखवले आहेत.

दोघांचा हा क्युट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एवढ्या वर्षांनंतर दोघांच्या नात्यामधील हे प्रेम लोकही खूश होत आहे. म्हणूनच व्हिडीओ यूजर्सच्या पसंतीस उतरत आहे. लोक सचिनचं भरभरुन कौतुक करत आहे. अनेकांनी अर्जुन तेंडुलकरच्या रणजी पदार्पणातील कामगिरी बाबतही सचिनचं अभिनंदन केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill : शुभमन गिलकडून झाली मोठी चूक! भारतीय कॅप्टनचा 'तो' व्हिडीओ लीक, बीसीसीआयला फटका बसणार?

Maharashtra Live News Update : विठू नामाच्या जयघोषात धाकटी पंढरी दुमदुमली

Laxman Hake News : अजित पवारांची माफी मागावी अन्यथा...; लक्ष्मण हाके यांना कायदेशीर नोटीस, अडचणी वाढणार

Shraddha kapoor: श्रद्धा कपूरचा ऑफ-शोल्डर ग्लॅमरस लूक पाहिलात का?

Bread Recipe: मुलांसाठी झटपट घरीच ब्रेडपासून बनवा 'हे' पदार्थ, रेसिपी वाचाच

SCROLL FOR NEXT