rohit sharma twitter
Sports

IND vs BAN 1st Test: 'घेऊ द्या ना मजा..', टीम इंडियाला हरवण्याची स्वप्न पाहणाऱ्या बांगलादेशला रोहितचं हटके प्रत्युत्तर

Rohit Sharma On IND vs BAN 1st Test: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषदेत बांगलादेशच्या कर्णधाराला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

Ankush Dhavre

भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना १९ सप्टेंबरपासून चेन्नईतील चेपॉकच्या मैदानावर रंगणार आहे.

या सामन्यासाठी भारतीय संघातील खेळाडू चेन्नईतील कडक उन्हात कसून मेहनत करत आहे. दरम्यान सामन्याला दोन दिवस शिल्लक राहिले असताना भारताचा कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत रोहितने बांगलादेशच्या कर्णधाराला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

बांगलादेशचा संघ पहिला कसोटी सामना खेळण्यासाठी चेन्नईत दाखल झाला आहे. दरम्यान भारतात येण्यापूर्वी बांगलादेशचा कर्णधार नजमुल शांतोने भारतीय संघाला हरवण्याबाबत वक्तव्य केलं होतं. नजमूल हुसेन शांतो म्हणाला होता की, ' निश्चितच, ही मालिका आमच्यासाठी आव्हानात्मक असणार आहे. गेल्या मालिकेत चांगली कामगिरी केल्यानंतर निश्चितच आमचा आणि आमच्या देशातील लोकांचा आत्मविश्वास वाढला आहे. प्रत्येक मालिका ही नवी संधी असते. आम्ही दोन्ही सामने जिंकण्यासाठीच मैदानात उतरु.'

बांगलादेशी कर्णधाराला रोहितचं वक्तव्य

रोहित शर्मा आपल्या स्पष्ट वक्तव्यांसाठी ओळखला जातो. पत्रकाराने नजमूल हुसेन शांतोबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना रोहित हसला आणि म्हणाला,' सर्व संघांना भारतीय संघाला पराभूत करायला आवडतं. घेऊ द्या त्यांना मजा. जेव्हा इंग्लंडचा संघ भारतात आला होता, त्यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनीही असंच काहीतरी म्हटलं होतं. पण आम्ही यावर लक्ष केंद्रीत करणार नाही, आम्हाला चांगलं क्रिकेट खेळायचं आहे. '

भारतीय संघ मार्च २०२४ नंतर पहिल्यांदाच कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तर दुसरीकडे बांगलादेशचा संघ नुकताच पाकिस्तान दौऱ्याहून परतला आहे. दोन्ही संघांमध्ये पार पडलेल्या २ कसोटी सामन्यांच्या मालिकेत बांगलादेशने शानदार खेळ करत २-० ने बाजी मारली. या विजयामुळे बांगलादेशचा कॉन्फिडन्स वाढला आहे. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये जोरदार लढत पाहायला मिळू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urine Infection : पुन्हा पुन्हा युरिन इन्फेक्शन होतंय? महिलांनो! जाणून घ्या नेमकं कारण अन् टाळा 'या' चुका

Maharashtra News Live Update: OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT