SA vs IND Saam Tv
Sports

SA vs IND 1st Test: गोलंदाजांच्या कामगिरीमुळे दिवसाअखेर टीम इंडियाची डावात वापसी; ५ विकेट गमावत आफ्रिकेच्या २५६ धावा

SA vs IND : भारतविरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील २ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियन येथील स्पोर्ट्स पार्क येथे खेळवला जात आहे. भारताच्या पहिल्या डावातील धावसंख्येच्या तुलनेत आफ्रिकन संघाकडे फक्त ११ धावांची आघाडी आहे.

Bharat Jadhav

SA vs IND 1st Test 2nd Day:

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या जात असलेल्या बॉक्सिंग डे कसोटीच्या दुसऱ्या दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात ५ गडी गमावून २५६ धावा केल्या. टीम इंडियाच्या गोलंदाजांच्या दमदारी कामगिरीमुळे आफ्रिकेच्या वाढत्या धावसंख्येला ब्रेक लागला. भारताकडून गोलंदाजीनी करताना बुमराह आणि सिराजने २-२ विकेट घेतल्या आहेत.(Latest News)

भारतविरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील २ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियन येथील स्पोर्ट्स पार्क येथे खेळवला जात आहे. या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पहिल्या डावात ५ विकेट गमावून २५६ धावा केल्या होत्या. भारताच्या पहिल्या डावातील धावसंख्येच्या तुलनेत आफ्रिकन संघाकडे फक्त ११ धावांची आघाडी आहे. दिवसाचा खेळ संपला तेव्हा डीन एल्गर मैदाना होता त्याने नाबाद राहत १४० धावा केल्या. तर मार्को जॅन्सन ३ धावांवर खेळत होता.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्राची सुरुवात झाली तेव्हा सर्वांच्या नजरा केएल राहुलच्या शतकाकडे लागल्या होत्या. केएल राहुलने १३३ चेंडूत आपले शतक पूर्ण केले आणि या सामन्यात भारतीय संघाचा पहिला डाव २४५ धावांवर आटोपला. उपाहारापूर्वी फलंदाजीला आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला ११ धावांवर एडेन मार्करामच्या रूपाने पहिला धक्का बसला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई स्वच्छ ठेवण्यासाठी नाल्यात उतरलेल्या कामगाराच्या नशिबी मृत्यू

ममता बॅनर्जी थेट सुप्रीम कोर्टात वकीलाच्या भूमिकेत, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप, न्यायालयात काय घडलं? VIDEO

सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण; कायद्यातील त्रुटींवरून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर हल्लाबोल

मोठी बातमी! भाजपने आपले 66 नगरसेवक अज्ञातस्थळी हलवले|VIDEO

राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार की लांबणार? शरद पवारांच्या वक्तव्यानंतर नवा ट्विस्ट, VIDEO

SCROLL FOR NEXT