ruturaj gaikwad statement after defeat against sunrisers hyderabad csk vs srh ipl 2024 amd2000 twitter
Sports

Ruturaj Gaikwad Statement: चेन्नईच्या पराभवानंतर ऋतुराज गायकवाड या खेळाडूंवर भडकला! सांगितलं पराभवाचं नेमकं कारण

CSK vs SRH,IPL 2024: चेन्नई सुपर किंग्ज संघाने आयपीएल २०२४ स्पर्धेला शानदार सुरुवात केली होती. मात्र सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाला ६ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Ankush Dhavre

Ruturaj Gaikwad Statement On Defeat:

चेन्नई सुपर किंग्ज संघाने आयपीएल २०२४ स्पर्धेला शानदार सुरुवात केली होती. मात्र सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाला ६ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करत असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने २० षटकअखेर १६५ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबाद संघाने १८.१ षटकात दिलेलं आव्हान पूर्ण केलं आणि शानदार विजय मिळवला. दरम्यान या विजयानंतर चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने पराभवाचं कारण सांगितलं आहे.

सामन्यानंतर काय म्हणाला ऋतुराज गायकवाड?

या सामन्यातील पराभवानंतर बोलताना ऋतुराज गायकवाड म्हणाला की,' खरं सांगायचं झालं तर, मला असं वाटतं की, ही खेळपट्टी संथ होती. त्यांनी चांगली गोलंदाजी केली आणि आम्हाला सामन्यात येऊच दिलं नाही. माझ्या मते आम्ही सुरुवातीला चांगली कामगिरी केली. मात्र त्यानंतर त्यांनी शानदार कमबॅक केलं. ही काळ्या मातीची खेळपट्टी होती त्यामुळे आम्हाला माहित होतं की, खेळपट्टी संथ असणार. मात्र ही खेळपट्टी त्याहून अधिक संथ होती.' (Cricket news in marathi)

पराभवाचं नेमकं कारण काय?

या सामन्यातील पराभवानंतर बोलताना ऋतुराज गायकवाड म्हणाला की, ' आम्ही पावरप्लेच्या षटकात जास्त धावा खर्च केल्या. एक झेल सोडला आणि एक महागडं षटक देखील होतं. असं असतानाही आम्ही हा सामना १९ व्या षटकापर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. १७०-१७५ धावांचं आव्हन आव्हानात्मक राहुल शकलं असतं. शेवटी दवाचं प्रमाण वाढलं होतं . तरीदेखील १५-१६ व्या षटकात मोईन अलीने चेंडू चांगला स्पिन केला.त्यामुळे मला मुळीच वाटत नाही की, सामना सुरु असताना खेळपट्टीत काही बदल झाला.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

New Rule : 1 ऑक्टोबरपासून सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम! ATM ते LPG पर्यंत 5 नवे नियम लागू, वाचा सविस्तर

Maharashtra News Live Update: २ तारखेच्या सीजेपीच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा- उद्धव ठाकरे

Car tyre replacement: किती किलोमीटर्सनंतर कारचे टायर बदलले पाहिजेत?

Maharashtra Politics : राज ठाकरे इंडिया आघाडीत जाणार? संजय राऊतांचं मोठं विधान

Railway Ticket: रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! तिकीटासोबत हे ओळखपत्र सोबत ठेवा, नाहीतर भरावा लागेल दंड

SCROLL FOR NEXT