rupay prime volleyball league ahemabad defenders beat mumbai meteors  saam tv news
Sports

तिसऱ्या रूपे प्राईम व्हॉलिबॉल लीग स्पर्धेत अहमदाबाद डिफेंडर्स संघाचा मुंबई मेटीयॉर्स संघावर सनसनाटी विजय

Rupay Prime Volleyball League: तिसऱ्या रूपे प्राईम व्हॉलिबॉल लीग स्पर्धेतील रोमांचकारी लढतीत अहमदाबाद डिफेंडर्स संघाने मुंबई मेटीयॉर्स संघाचा 15-12, 15-11, 14-16, 13-15, 15-13 असा पराभव करून सनसनाटी विजय नोंदवला.

Ankush Dhavre

Rupay Prime Volleyball League:

तिसऱ्या रूपे प्राईम व्हॉलिबॉल लीग स्पर्धेतील रोमांचकारी लढतीत अहमदाबाद डिफेंडर्स संघाने मुंबई मेटीयॉर्स संघाचा 15-12, 15-11, 14-16, 13-15, 15-13 असा पराभव करून सनसनाटी विजय नोंदवला.

ए 23प्रायोजित ही स्पर्धा जवाहरलाल नेहरू इंडोर स्टेडियम येथे सुरू आङे. या स्पर्धेत नंधागोपाल सामन्याचा मानकरी ठरला.

सामन्यात नंधागोपालच्या आक्रमक खेळाचे आव्हान असताना मुंबईच्या कर्णधार मुथूस्वामी अप्पावू याने सुरेख पास देत तोडीस तोड खेळ केला. एलएम मनोज याने मधल्या फळीत शमीन आणि अमित गुलियाला साथ देताना मुंबई संघाला काही गुण मिळवून दिले. पण मॅक्स सेनिकाने आक्रमक खेळ करत अहमदाबाद संघाला पहिला सेट जिंकून आघाडी प्राप्त करून दिली.

दुसऱ्या बाजूला मनोजने मुंबईचे आक्रमण थोपवून धरले. इल्या बुरावने त्याला साथ देत गतविजेत्या अहमदाबाद डिफेंडर्स संघाने आपल्या चमकदार खेळाचे दर्शन घडविले. अहमदाबाद संघाने केलेल्या चुकांमुळे मुंबई संघाला संधी निर्माण झाली होती, परंतु अहमदाबाद संघाच्या बचाव पटुनी महत्वपूर्ण सुपर पॉइंट घेत सामन्यावर पकड कायम ठेवली. तर, मुंबईच्या अजित लाल याला अखेरपर्यंत सुर गवसला नाही. (sports news in marathi)

नंधागोपालच्या अफलातून सर्व्हिसेसमुळे मुंबई संघावर अहमदाबाद संघाने आपले वर्चस्व कायम राखले. पण सौरभ मान च्या सुरेख खेळामुळे मुंबई संघाने सामन्यात पुनरागमन केले. शमीनने देखील त्याला साथ देत मुंबई संघाला बरोबरी साधून दिली व संघाचे सामन्यातील आव्हान कायम राखले.

त्यानंतर बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरलेल्या जेरी डॅनियलने उत्कृष्ट सर्व्हिस करत प्रतिस्पर्धी संघावर दबाव निर्माण केला. पण अखेरच्या क्षणी नंधागोपालने आपला रंगतदार खेळ सुरू ठेवत सुपर सर्व्हिस करून संघाला विजय मिळवून दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT