kkr vs rr twitter/ IPL
Sports

RR vs KKR, Toss: केकेआरने टॉस तर जिंकला, पण अजिंक्यने फॅन्सचं टेन्शन वाढवलं; नेमकं काय घडलं?

RR vs KKR Toss Update: आयपीएल २०२५ स्पर्धेत आज होणाऱ्या सामन्यात केकेआर आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ भिडणार आहेत.

Ankush Dhavre

आयपीएल २०२५ स्पर्धेत आज होणाऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ भिडणार आहेत. हा सामना गुवाहटीमध्ये रंगणार आहे. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान नाणेफेक जिंकताच अजिंक्य रहाणेने केकेआरच्या फॅन्सला धक्का दिला आहे.

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या केकेआरला स्पर्धेतील पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे हा सामना केकेआरसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. या सामन्यात प्रथम गोलंदाजीसाठी येणाऱ्या केकेआर संघात मोठा बदल करण्यात आला आहे. संघातील प्रमुख अष्टपैलू खेळाडू सुनील नरेनला प्लेइंग ११ मध्ये स्थान देण्यात आलेलं नाही.

सुनील नरेन दुखापतीमुळे नव्हे, तर आजारी असल्यामुळे प्लेइंग ११ मधून बाहेर आहे. त्याच्या जागी बदली खेळाडू म्हणून मोईन अलीला संघात स्थान देण्यात आलं आहे. सुनील नरेनचा राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळताना रेकॉर्ड दमदार राहिला आहे. त्याने गेल्या हंगामात राजस्थानविरुद्ध खेळताना शानदार शतकी खेळी केली होती.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

कोलकाता नाईट रायडर्स (Playing XI): क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), वेंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, मोईन अली, आंद्रे रसेल, रामनदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.

राजस्थान रॉयल्स (Playing XI): यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, नितीश राणा, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिमरोन हेटमायर, वानिंदु हसरंगा, जोफ्रा आर्चर, महीश थीक्षाना, तुषार देशपांडे, संदीप शर्मा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपची जबरदस्त खेळी; कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश

Kalyan News : कल्याण डोंबिवली शहर रात्री प्रकाशमय होणार; महापालिकेने घेतला मोठा निर्णय

KOLHAPUR GOKUL MORCHA: दूध उत्पादकांचा डिबेंचरसाठी गोकूळ दुध संघाविरोधात मोर्चा; पण डिबेंचर म्हणजे नेमकं काय?

SCROLL FOR NEXT