rohit shrma  saam tv
Sports

WTC 2023 Final: IPL ची ट्रॉफी हुकली म्हणून काय झालं? रोहितकडे विराटला मागे सोडत इतिहास रचण्याची संधी..

Rohit Sharma Record In WTC: भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

Ankush Dhavre

IND Vs AUS WTC 2023 Final: आयपीएल २०२३ स्पर्धेचा अंतिम सामना नुकताच पार पडला. अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने गुजरात टायटन्स संघावर जोरदार विजय मिळवला.

आता सर्वांचे लक्ष वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यावर असणार आहे. ७ ते ११ जून दरम्यान पार पडणाऱ्या या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

अंतिम सामन्यासाठी विराट कोहलीसह भारतीय संघातील काही खेळाडूंनी सराव करायला सुरुवात केली आहे. तर रोहित शर्मा देखील ३० मे रोजी इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. हा सामना कर्णधार रोहित शर्मासाठी अतिशय खास असणार आहे.

रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. मात्र आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत त्याला एक मोठा विक्रम रचण्याची संधी असणार आहे.

रोहित शर्माला इतिहास रचण्याची संधी..

रोहित शर्माने जर या सामन्यात जोरदार कामगिरी करून विजय मिळवून दिला तर त्याच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद होणार आहे. तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची ट्रॉफी जिंकणारा पहिला भारतीय कर्णधार ठरू शकतो.

तसेच त्याला आयसीसी ट्रॉफी जिंकणाऱ्या कर्णधारांच्या यादीत प्रवेश करण्याची संधी असणार आहे. विराट कोहली आपल्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला आयसीसीची एकही ट्रॉफी जिंकवू शकला नव्हता. या बाबतीत रोहित शर्मा त्याला मागे टाकू शकतो.

अंतिम सामन्यापूर्वी रोहित शर्माचा फॉर्म भारतीय संघासाठी चिंतेचा विषय ठरतोय. कारण नुकताच पार पडलेल्या आयपीएल २०२३ स्पर्धेत रोहितला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. या हंगामात त्याला अवघ्या ३३२ धावा करता आल्या आहेत. या सामन्यातही रोहित फ्लॉप ठरला तर, विराट कोहली, शुभमन गिल आणि अजिंक्य रहाणेवर त्याची जागा भरुन काढण्याची जबाबदारी असणार आहे. (Latest sports updates)

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी असा आहे भारतीय संघ:

भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.

राखीव खेळाडू: यशस्वी जयस्वाल, मुकेश कुमार, सूर्यकुमार यादव.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT