Rohit Sharma speech in Vidhan Bhavan twitter
Sports

Rohit Sharma in Assembly:...नाहीतर मी त्याला बसवला असता, सूर्याच्या कॅचवरुन रोहितचं 3 मिनिटांचं भाषण गाजलं; पाहा VIDEO

Rohit Sharma speech In Assembly after Winning T20 WC 2024: विधानसभेत भारतीय खेळाडूंचा सत्कार सोहळा पार पडला. दरम्यान रोहितने आपल्या भाषणात सूर्यकुमार यावदच्या झेलचा उल्लेख केला आहे.

Ankush Dhavre

भारतीय संघातील खेळाडूंनी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत घवघवीत यश मिळवलं आहे. बारबाडोसमध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनीत धुव्वा उडविला. यासह दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकपच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. या ऐतिहासिक कामगिरीनंतर भारतीय संघातील खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. दरम्यान वर्ल्डकप विजेत्या संघातील ४ खेळाडूंचा विधानभवनात सत्कार करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारताचा कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल यांना आमंत्रण दिलं होतं. यावेळी कर्णधार रोहित शर्माने विधानभवनात मराठीत भाषण केलं. यावेळी त्याने सूर्यकुमार यादवने टिपलेल्या झेलचा उल्लेख केला.

रोहितने मराठीत भाषण केलं. यावेळी तो म्हणाला की, 'सर्वांना नमस्कार माझा. मला इथे बोलवल्याबद्दल मी मुख्यमंत्री साहेबांचे आभार मानतो. साहेबांनी असं सांगितलं की, असा कार्यक्रम कधी झाला नव्हता. हे पाहून आम्हाला आनंद झाला. वर्ल्डकप भारतात आणायचा हे सर्वांचं स्वप्न होतं, आमचंही स्वप्न होतं. ११ वर्ष आम्ही या क्षणाची वाट पाहिली. २०१३ मध्ये आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलो होतो. मी संपूर्ण संघाचा आभारी आहे. हे माझ्यामुळे नाहीतर संपूर्ण संघामुळे शक्य झालं आहे.'

सूर्याच्या कॅचचा उल्लेख करत तो म्हणाला की, ' सूर्याने सांगितलं की बॉल त्याच्या हातात बसला. बॉल हातात बसला नसला तर मी त्याला बसवला असता.' यानंतर रोहितने सर्वांचे आभार मानले. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल यांचा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणि १ कोटींचा धनादेश देऊन सत्कार करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Iran- Israel Conflict: इराण पेटलं! इस्राइलकडून तेलसाठ्यांवर हल्ला, तेहरानमध्ये अग्नितांडव; पाहा VIDEO

Kanji Vada Recipe: अमरावतीतला फेमस कांजी वडा बनवण्याची सोपी रेसिपी लगेचच घ्या जाणून, नाश्त्यासाठी बेस्ट डिश

Maharashtra Live News Update: किल्ले रायगडच्या पायथ्याशी साजरा होणार मनसेचा 20 वा वर्धापन दिन

T20 World Cup Final चा इफेक्ट! अहमदाबादमध्ये हॉटेल दर 300-400 टक्क्यांनी वाढले, एका रात्रीसाठी 2.37 लाख रुपये

Kokan M2M Ferries : कोकणकरांसाठी आनंदाची बातमी! नव्या M2M फेरीला आणखी दोन ठिकाणी थांबा मिळणार; जाणून घ्या

SCROLL FOR NEXT