Rohit Sharma  Saam Digital
Sports

Rohit Sharma : फोटोसोबत केली छेडछाड, रोहित शर्मावर मोठा आरोप, T20 मालिका जिंकल्यानंतर अभिनंदन करताना असं काय घडलं?

Rohit Sharma Fitness News : भारतीय क्रिकेट संघाने नुकताच श्रीलंका दौऱ्यात T20 मालिका जिंकली आहे. त्यांचं अभिनंतर करताना रोहित शर्माने आपल्या फोटोसोबत छेडछाड केल्याचा आरोप होत आहे.

Sandeep Gawade

भारतीय क्रिकेट संघाने नुकताच श्रीलंका दौऱ्यात T20 मालिका जिंकली आहे. या युवा संघाचं वनडे कर्णधार रोहित शर्माने अभिनंदन केलं आहे. सोशल मीडियावर यासंदर्भातील एक पोस्ट व्हायरल झाली आहे. आहे. या पोस्टमध्ये रोहित शर्माने फोटोसोबत छेडछाड केल्याचा हा आरोप आहे. सोशल मीडियावर चाहत्यांकडून त्याला ट्रोल करण्यात येत आहे. फोटो टेम्परिंगचा आरोप करण्यात येत आहे. मात्र रोहितने मालिका जिंकल्याबद्दल सूर्यकुमार यादव आणि टीमचं अभिनंदन केलं आहे.

जर विजयाच्या फोटोशी छेडछाड केल्याचा आरोप रोहितवर करण्यात आला आहे, असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही चुकीचे आहात. ज्या फोटोशी छेडछाड केल्याचा आरोप त्याच्यावर आहे तो फोटो त्याचाच आहे. त्याने स्वतः शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये रोहितचे पोट दिसत नाही. बीसीसीआयने शेअर केलेल्या त्याच छायाचित्रात त्याचे पोट दिसत आहे. स्वत:ला फिट दाखवण्यासाठी रोहितने असं केल्याचा आरोप त्याच्यावर होत आहे.

रोहित शर्मा सध्या फॉर्ममध्ये आहे, मात्र त्याच्या फिटनेसवरून तो नेहमी ट्रोल होतो. अनेक माजी क्रिकेटपटूंही रोहित शर्माच्या फिटनेसवर चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान रोहित शर्माच्या तो खरा की खोटा याची पुष्टी होत नाही. मात्र एक गोष्ट निश्चित आहे, रोहित शर्माच्या चाहत्यांना त्याच्यावरील अशा प्रकारच्या आरोपांमुळे त्रास होत नाही. रोहित शर्मा त्याच्या त्यांचा चॅम्पियन कर्णधार असल्याचे चाहत्यांनी म्हटलं आहे. तंदुरुस्त असो वा नसो, त्यांने जगातील सर्व गोलंदाजांना पाणी पाजलं आहे, असं त्यांच्या चाहत्यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शरद पवार गटाला धक्का; २ बड्या नेत्यांसह शेकडो कार्यकर्ते अजित पवार गटाच्या वाटेवर, लवकरच पक्षप्रवेश होणार

Maharashtra Live News Update: भंडाऱ्यात परतीच्या पावसानं शेतकऱ्यांची चिंता वाढली

Shocking : मुंबईत रक्तरंजित थरार! हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू, बॉयफ्रेंडनेही आयुष्य संपवलं

EPFO Rule: तुमची कंपनी PF खात्यात कमी रक्कम जमा करतेय का? अशा प्रकारे एका क्लिकवर तपासा संपूर्ण माहिती

Urmila Matondkar: मराठमोळ्या उर्मिला मातोंडकरचा दिवाळी स्पेशल ग्लॅमर्स लूक, पाहा खास PHOTO

SCROLL FOR NEXT