rohit sharma  twitter
Sports

Rohit Sharma On Retirement: रोहित शर्माचा मोठा खुलासा! वनडे- कसोटीतील निवृत्तीबाबत केलं मोठं वक्तव्य

Rohit Sharma News In Marathi: रोहित शर्माने टी-२० वर्ल्डकप झाल्यानंतर टी-२० क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला होता.

Ankush Dhavre

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर रोहितने टी-२० आतंरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला. रोहितसह विराट कोहली आणि रविंद्र जडेजानेही टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. दरम्यान रोहितला निवृत्तीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देत त्याने म्हटलंय की, त्याने इतका पुढचा विचार केलेला नाही.

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केल्यानंतर सर्वत्र रोहितच्या वनडे आणि कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीबाबत चर्चा होत आहे. अनेकांना असं वाटत आहे की, रोहित २०२७ मध्ये होणाऱ्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करु शकतो. तर काहींचं म्हणणं आहे की, तो या स्पर्धेपूर्वीच निवृत्तीची घोषणा करु शकतो.

निवृत्तीच्या प्रश्नावर काय म्हणााला रोहित शर्मा?

रोहित शर्माने १४ जुलै रोजी डलासमध्ये एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी त्याला निवृत्तीबाबत प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देत तो म्हणाला की, ' मी इतक्या दुरचा विचार करत नाही. त्यामुळे हे स्पष्ट आहे की, तुन्ही मला आणखी काही वेळ खेळताना पाहू शकता.'

रोहित २०२७ वनडे वर्ल्डकप खेळणार?

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकली. दरम्यान ही स्पर्धा झाल्यानंतर टी-२० कर्णधाराची खुर्ची रिकामी झाली आहे. ही जागा घेण्यासाठी हार्दिक पंड्याला प्रबळ दावेदार मानलं जात आहे. तर रोहित शर्मा वनडे आणि कसोटी संघाचं नेतृत्व करताना दिसून येऊ शकतो. काही दिवसांपूर्वी जय शहा यांनी सांगितलं होतं की, महत्वाच्या स्पर्धांमध्ये रोहित भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसून येईल. दरम्यान यावरुन स्पष्ट होतंय की, रोहित २०२५ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि २०२७ वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसून येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोप्पा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

Rupali Bhosle: 'रूप तेरा मस्ताना' रूपाली भोसलेचे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल...

SCROLL FOR NEXT