Virat Kohli Century Rohit Sharma Reaction saam tv
Sports

Rohit Sharma: 'अरे सिक्स मार ना...' विराटच्या सेंच्युरीसाठी रोहितचा जीव वर-खाली, ड्रेसिंग रूममधून इशारा करताच कोहलीने केलं असं की...!

Virat Kohli Century Rohit Sharma Reaction : विराटच्या खेळीच्या जोरावर भारताने पाकिस्तानवर सहा विकेट्स राखून मात केली. कोहलीचे हे ५१ वं वनडे शतक होतं. याआधी विराट कोहलीने वर्ल्ड कप 2023 मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सेमीफायनल सामन्यात आपलं 50 वं शतक झळकावलं होतं.

Surabhi Jayashree Jagdish

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या २०२५ च्या हायव्होल्टेज भारत विरूद्ध पाकिस्तानच्या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला. या विजयासह चाहत्यांना गेल्या अनेक दिवसांपासून हवं असलेलं विराट कोहलीचं शतक देखील मिळालं. बऱ्याच काळापासून आऊट ऑफ फॉर्म असलेल्या विराट कोहलीची बॅट अखेर तळपली.

विराट कोहलीची तुफान खेळी

कोहलीने पाकिस्तानविरुद्ध 111 बॉल्समध्ये नाबाद 100 रन्सची खेळी केली. या डावात विराटने 7 फोर मारले. विराटच्या खेळीच्या जोरावर भारताने पाकिस्तानवर सहा विकेट्स राखून मात केली. कोहलीचे हे ५१ वं वनडे शतक होतं. याआधी विराट कोहलीने वर्ल्ड कप 2023 मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सेमीफायनल सामन्यात आपलं 50 वं शतक झळकावलं होतं. कोहली ९६ धावांवर खेळत असताना भारताला विजयासाठी दोन रन्सची गरज होती. यावेळी कोहलीने थेट फोर मारत आपलं शतक पूर्ण केलं.

रोहित शर्माची रिएक्शन व्हायरल

दरम्यान यावेळी ड्रेसिंग रूमध्ये बसलेला रोहित शर्मा कोहलीपेक्षा जास्त खूश दिसत होता. कोहली सेंच्युरीच्या जवळ येताच रोहितने त्याला थेट सिक्स मारण्याचा इशारा ड्रेसिंग रूममधून केला. यानंतर खुशदिलच्या पुढच्याच चेंडूवर कोहली फोर मारला आणि स्वतःची सेंच्युरी पूर्ण करत टीम इंडियाला सामना देखील जिंकवून दिला.

मैदानातून कोहलीचा रोहितला खास इशारा

सेंच्युरी पूर्ण झाल्यानंतर विराट कोहलीने रोहित शर्माकडे बोट दाखवून, 'मैं हूं ना' असा इशारा केल्याचंही दिसून आलं. यापूर्वी केएल राहुल आणि हार्दिक पांड्या तसंच सूर्यकुमार यादव यांनी अशा पद्धतीचं सेलीब्रेशन केलं होतं.

रोहित शर्माच्या नावे नवा रेकॉर्ड

रोहित शर्माने पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात १ रन करताच वनडे क्रिकेटमध्ये ओपनर फलंदाज म्हणून ९००० धावांचा पल्ला गाठला आहे. ही कामगिरी त्याने १८१ व्या डावात करुन दाखवला आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड भारताचा सचिन तेंडुलकरच्या नावे होता. सचिनने ओपनर म्हणून ९००० धावांपर्यंतचा पोहोचण्याचा पल्ला १९७ व्या डावात गाठला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Close: बँकेची कामं पडणारं पेंडिंगवर; सोमवारी बँका असतील बंद, काय आहे कारण

Maharashtra News Live Update: Mumbai: गृहमंत्री अमित शाह यांची पत्रकार परिषद

Vastu Tips for Bathroom Taps: बाथरूममध्ये नळ बसवताना लक्षात ठेवाव्यात ‘या’ ५ महत्त्वाच्या टिप्स

Skincare Routine: फेसवॉश ते सनस्क्रीन; स्किनकेअर रुटीनमध्ये कोणते प्रोडक्ट कधी आणि कसे वापरायचे?

माजी पंतप्रधानांच्या नातवाचा कारनामा! तुरुंगातील फोनमध्ये सापडले 145 अश्लील व्हिडिओ; देशभरात खळबळ

SCROLL FOR NEXT