Rohit Sharma x
Sports

Rohit Sharma : डग आउटमध्ये बसून रोहितनं प्लान आखला, पुढच्या ओव्हरमध्ये मिचेल मार्शची विकेट; नेमकं काय झालं?

Rohit Sharma MI : Rohit Sharma MI : आजच्या लखनऊ विरुद्धच्या सामन्यामध्ये रोहित शर्माला वगळण्यात आले आहे. तो डगआउटमध्ये बसून सामना पाहत आहे. डग आउटमध्ये बसून त्याने फिल्ड सेट करुन मुंबईला पहिली विकेट मिळवून दिली.

Yash Shirke

LSG VS MI Live : एकाना स्टेडियममध्ये लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स ही लढत सुरु आहे. या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सराव सत्रादरम्यान गुडघ्याला दुखापत झाल्याने रोहित शर्माला प्लेईंग ११ मधून वगळण्यात आले. पण सामना पाहण्यासाठी तो डग आउटमध्ये बसला होता.

लखनऊचे सलामीवीर एडन माक्ररम आणि मिचेल मार्श मैदानात उतरले. पॉवर प्लेमध्ये त्यांनी मुंबईवर दबाव टाकला. सहाव्या ओव्हरपर्यंत लखनऊची धावसंख्या ६० धावांच्या पुढे गेली होती. लखनऊने सामन्यावर पकड घट्ट केल्याचे पाहायला मिळत होते. दुसऱ्या बाजूला मुंबईचे शिलेदार विकेट घेण्यासाठी प्रयत्न करत होते. पण त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत नव्हते. तेव्हा डग आउटमध्ये बसलेला रोहित शर्मा मदतीला आला.

स्ट्रॅटेजिक टाईम आऊटमध्ये रोहित शर्मा डग आउटमधून मैदानात उतरला. त्याने फिल्डमध्ये त्याच्या हिशोबाने बदल केले. पुढे सहाव्या ओव्हरमध्ये विग्नेश पुथुर गोलंदाजी करण्यासाठी आला. ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर मिचेल मार्शने समोर शॉट मारला. तेव्हा विग्नेशने चपळाईने कॅच पकडला. रोहितने फिल्ड सेट केल्यानंतर दबावात मिचेल मार्शने चुकीचा शॉट मारला आणि रोहितमुळे पहिली विकेट मिळाली असे चाहते म्हणत आहेत.

मुंबई इंडियन्सची प्लेईंग ११ -

विल जॅक्स, रेयान रिकल्टन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (कर्णधार), नमन धीर, राज बावा, मिचेल सँटनर, ट्रेंट बोल्ड, अश्वनी कुमार, दीपक चहर, विग्नेश पुथुर.

लखनऊ सुपर जायंट्सची प्लेईंग ११ -

एडन माक्ररम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, रिषभ पंत (कर्णधार), आयुष बडोनी, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकुर, दिग्वेश राठी, आकाश दीप, आवेश खान.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT