rohit sharma yandex
Sports

Rohit Sharma, IPL 2025: रोहित शर्मा मुंबई इंडियन्सला रामराम करणार? हे 2 संघ 50 कोटी द्यायला तयार

IPL Mega Auction 2025, Rohit Sharma: मुंबई इंडियन्स संघाचा स्टार खेळाडू रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघाची साथ सोडणार असल्याची चर्चा सुरु आहे. दरम्यान २ संघ त्याच्यावर ५० कोटींची बोली लावायलाही तयार आहेत.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेपूर्वी मेगा लिलाव होणार आहे. या लिलावाची तारीख अजूनही समोर आलेली नाही. मात्र माध्यमातील वृत्तानुसार, येत्या डिसेंबर महिन्यात या स्पर्धेसाठी मेगा लिलाव होऊ शकतो. या लिलावापूर्वी अनेक मोठे बदल पाहायला मिळू शकतात.

संघातील स्टार खेळाडू संघाला निरोप देऊन दुसऱ्या संघात प्रवेश करू शकतात, अशी चर्चा सुरू आहे. दरम्यान माध्यमातील वृत्तात असाही दावा केला जात आहे की, रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघाची साथ सोडू शकतो.

किती लागणार बोली?

रोहित शर्माने आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात डेक्कन चार्जर्स संघाकडून खेळताना केली होती. त्यानंतर त्याने मुंबई इंडियन्स संघात प्रवेश केला. तेव्हापासून ते आतापर्यंत तो या संघाकडून खेळतोय आणि संघाचं नेतृत्व करताना ५ ट्रॉफी देखील जिंकून दिल्या आहेत. दरम्यान तो आता मुंबई इंडियन्सची साथ सोडणार असं म्हटलं जात आहे.

रोहित शर्मासारखा अनुभवी कर्णधार आणि विस्फोटक फलंदाज जर लिलावात उतरला, तर सर्व फ्रेंचायझी पैशांचा पाऊस पाडायला काहीच कसर सोडणार नाही.

रोहित लिलावात येणार, ही माहिती मिळताच सर्व फ्रेंचायझींनी त्याला संघात घेण्यासाठीची प्लॅनिंग सुरू केली आहे. माध्यमातील वृत्तानुसार, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स संघाने प्रत्येकी ५०-५० कोटी बाजूला काढून ठेवले आहेत.

यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की, रोहितवर ५० कोटींची बोली लावली जाऊ शकते. आतापर्यंत कुठल्याच स्पर्धेच्या इतिहासात इतकी मोठी बोली लावली गेलेली नाही. त्यामुळे रोहित शर्मा आयपीएल २०२५ स्पर्धेच्या लिलावात इतिहास रचू शकतो.

आयपीएल २०२४ स्पर्धा सुरू होताच मुंबई इंडियन्सच्या फॅन्सला धक्का बसला होता. गेल्या १० वर्षांपासून संघाचं नेतृत्व करणाऱ्या आणि ५ ट्रॉफी जिंकून देणाऱ्या रोहितला कर्णधारपदावरून काढून टाकलं. त्यानंतर हार्दिक पंड्याकडे भारतीय संघाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना मुंबई इंडियन्सचा संघ पूर्णपणे फ्लॉप ठरला. या स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा गुणतालिकेत सर्वात शेवटी होता.

लखनऊ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार केएल राहुल देखील लखनऊची साथ सोडणार आहे. त्यामुळे या संघाला अनुभवी कर्णधाराची गरज आहे. तर दिल्लीलाही अनुभवी कर्णधार आहे. त्यामुळे ते रोहितवर मोठी बोली लावू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

Thackeray Brothers Reunion: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने विरोधकांची पायाखालची वाळू सरकली – शिवसैनिकांची प्रतिक्रिया|VIDEO

Actress Father shot: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर भरदिवसा गोळीबार; नेमकं काय घटलं? वाचा घटनाक्रम

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळाला; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

Amarnath Yatra Bus Accident : अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांचा भीषण अपघात; 5 बस एकमेकांना आदळल्या, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT