Rohit Sharma Ajit Agarkar Leaked Video X (Press conference BCCI)
Sports

Rohit Sharma Leaked Video : "मला सेक्रेटरीसोबत बसावं लागणार.." रोहित शर्मा-अजित आगरकर यांच्यातील संभाषण लीक

Rohit Sharma Viral Video : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीच्या भारतीय संघाची घोषणा करण्यासाठी रोहित शर्मा आणि अजित आगरकर पत्रकार परिषदेला उपस्थित होते. परिषद सुरु होण्यापूर्वी रोहितने आगरकरांनी संवाद साधला होता.

Yash Shirke

Rohit Sharma Leaked Video : येत्या महिन्याभरात चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. बीसीसीआयने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघाची घोषणा केली. बीसीसीआयद्वारे आज (१८ जानेवारी) पत्रकार परिषद बोलावली होती. या परिषदेत निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा उपस्थित होते. त्यांनी मिळून दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या १५ जणांची यादी जाहीर केली. पत्रकार परिषद दरम्यान रोहित शर्मा आणि अजित आगरकर यांच्यातील संभाषण लीक झाले.

मुंबईत पत्रकार परिषद सुरु होण्यापूर्वी रोहित शर्मा आणि अजित आगरकर आपापल्या जागी बसले होते. तेव्हा रोहित आगरकर यांच्याशी खासगी गप्पा मारु लागला. रोहित शर्मा म्हणाला, "आता ही पत्रकार परिषद संपल्यावर मला एक दीड तास बसावं लागलं, सेक्रेटरीसोबत बसावं लागणार आहे. फॅमिली वॅमिलीबद्दल डिस्कस करायचंय, सगळेजण मला बोलत आहेत यार.." (अब मेरे को अब बैठना इसके बाद, एक डेढ घंटा बैठना पडेगा सेक्रेटरी के साथ, फॅमेली वॅमेली का डिस्कस करने के लिए, सब मेरे को बोल रहे है यार..)

रोहित शर्मा - अजित आगरकर यांच्यातील खासगी संभाषण सुरु होण्यापूर्वीच पत्रकार परिषद सुरु झाली. त्यामुळे रोहितच्या बोलण्यावर अजित आगरकर यांना उत्तर देता आले नाही. पत्रकार परिषद सुरु होण्यापूर्वी कॅमेरे सुरु झाले होते. कॅमेरे बंद आहेत असे रोहित शर्माला वाटले आणि त्याने आगरकरांनी खासगीतला संवाद सर्वांसमोर केला. रोहितच्या बोलण्यातील 'फॅमिली वॅमिलीबद्दल डिस्कस' हे बीसीसीआयच्या नियमाला उद्देशून आहे असे म्हटले जात आहे.

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये पराभव झाल्यानंतर बीसीसीआयने सर्व खेळाडूंवर कडक नियम लागू केले. यापैकी एक नियमानुसार, भारतीय संघ ४५ दिवसांपेक्षा अधिकच्या दौऱ्यावर असेल तर खेळाडूंना केवळ २ आठवडे आपल्या कुटुंबीयांसोबत राहण्याची अनुमती दिली जाईल. या संबंधित परवानगी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याकडून घ्यावी लागेल. या नियमावर चर्चा करण्यासाठी 'मी बीसीसीआयच्या सचिवांना भेटणार आहे', असे रोहित व्हिडीओमध्ये म्हणाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Central Railway Mega Block: मुंबईकरांनो लक्ष द्या! रविवारी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक; घराबाहेर पडताना वेळपत्रक वाचा

Maharashtra Live News Update : नांदेडमध्ये 70 ते 75 जणांतून पाण्यातून विषबाधा

OPPO Find X9 Series: येणार येणार तुमचा फोटो भारीच येणार! दमदार कॅमेरावाला OPPO Find X9 Series च्या लॉन्चची तारीख आली समोर

Rishab Shetty : 'कांतारा'च्या यशानंतर ऋषभ शेट्टी पोहचला वाराणसीला, घेतले महादेवाचे दर्शन

Kalyan Crime: धक्कादायक! शिंदेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकावर हल्ला, कल्याणमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT