Rohit Sharma Saam tv
Sports

Rohit Sharma Injury: टीम इंडियाला मोठा धक्का! कर्णधार रोहित शर्मा दुखापतग्रस्त; WTC फायनल खेळणार का?

WTC Final: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना सुरु व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत.

Ankush Dhavre

IND VS AUS WTC Final 2023: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना सुरु व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. लंडनच्या ओव्हल मैदानावर हा सामना पार पडणार आहे. या सामन्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी कसून सराव केला आहे.

मात्र सामना तोंडावर असताना भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. कर्णधार रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाला आहे.

भारतीय संघाला दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप खेळण्याची संधी मिळाली आहे. पहिल्या हंगामातील अंतिम सामन्यात भारतीय संघाला न्यूझीलंड संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.

दुसऱ्यांदा मिळालेल्या संधीचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी भारतीय संघातील खेळाडू जोरदार सर्व करत आहे. मात्र सामन्याच्या एक दिवसापूर्वी सराव करत असताना कर्णधार रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाला आहे.

त्याच्या डाव्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. नेट्समध्ये सराव करत असताना त्याला दुखापत झाली आहे. ही दुखापत गंभीर नसल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे तो उद्या होणाऱ्या सामन्यात खेळताना दिसून येऊ शकतो .

यापूर्वी देखील झाला होता दुखापतग्रस्त..

रोहित शर्मा यापूर्वी टी -२० वर्ल्ड २०२२ स्पर्धा सुरु असताना दुखापतग्रस्त झाला होता. ८ नोव्हेंबर २०२२ रोजी जेव्हा रोहित शर्मा नेट्समध्ये सराव करत होता, त्यावेळी १५० किमीचा चेंडू त्याच्या अंगठ्याला लागला होता.

ही दुखापत इंग्लंड संघाविरुद्व झालेल्या सेमी फायनलपूर्वी झाली होती. मात्र त्यानंतर देखील तो मैदानात उतरला होता. इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने २७ धावांची खेळी केली होती. या हा सामना भारतीय संघाने १० विकेट्सने गमावला होता. (Latest sports updates)


वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी असा आहे भारतीय संघ :

भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.

राखीव खेळाडू: यशस्वी जयस्वाल, मुकेश कुमार, सूर्यकुमार यादव

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

SCROLL FOR NEXT