rohit sharma saam tv
Sports

Rohit sharma: भर सामन्यात रोहित शर्माने सरफराजवर उगारला हात; पाहा मॅचदरम्यान असं काय घडलं?

Rohit sharma: सराव सामन्यात रोहित शर्माने टीम इंडियाचा फलंदाज सरफराज खानवर हात उचलला. यावेळी त्याने त्याच्या पाठीवर बुक्का देखील मारला.

Surabhi Jayashree Jagdish

६ डिसेंबरपासून भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरी टेस्ट खेळवण्यात येणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाने एक सराव सामना खेळला. प्राईम मिनिस्टर इलेव्हन यांच्यासोबत हा सराव सामना खेळवण्यात आला.

दरम्यान या सामन्यात एक घटना अशी घडली की सर्व चाहते थक्क झाले. या सामन्यामध्ये रोहित शर्माने टीम इंडियाचा फलंदाज सरफराज खानवर हात उचलला. यावेळी त्याने त्याच्या पाठीवर बुक्का देखील मारला.

कधी घडली ही घटना?

प्राईम मिनिस्टर इलेव्हनची टीम फलंदाजी करत असताना ही घटना घडली. यावेळी डावाच्या 23व्या ओव्हरमध्ये जॅक क्लेटन बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेल्या ऑलिव्हर डेव्हिसला हर्षित राणाने शॉर्ट-पिच बॉल टाकला. त्यावेळी ही घटना घडली. यावेळी बॉल क्लेटनच्या पुढे गेला. पण विकेटकीपिंग करत असलेल्या सरफराजला बॉल पकडण्यात अपयश आलं. यावेळी चेंडू जमिनीवर पडला. सरफराज तो उचलण्यासाठी वाकला असतानाच रोहितने त्याच्या पाठीवर जोरात बुक्का मारला. दरम्यान या घटनेनंतर दोघंही एकमेकांकडे पाहून हसू लागले.

हर्षित राणाने पटकावले ४ विकेट्स

सराव सामन्यात हर्षित राणाने उत्तम कामगिरी केली. राणाने ऑलिव्हर डेव्हिसला शून्यावर क्लीन बोल्ड केलं. दरम्यान पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ रद्द झाल्यानंतर दोन दिवसीय सराव सामना 50-50 ओव्हर्सचा करण्यात आला होता.

भारताने पीएम इलेव्हनला 240 रन्सवर रोखलं. पाच सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा दुसरा सामना 6 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये दिवस-रात्र स्वरूपात खेळवला जाणार आहे.

पहिल्या टेस्ट सामन्यात भारताचा विजय

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या टेस्ट सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 295 रन्सने पराभव झाला. जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पर्थमध्ये पहिल्या डावात केवळ 150 रन्स केले झाल्या होते . त्यामुळे आता दुसऱ्या सामन्यात टीम इंडिया विजयाचा रथ सुरुच ठेवते का पाहावं लागणार आहे.

दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा स्टार वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड बाजूच्या ताणामुळे पुढील सामन्यातून बाहेर पडला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया टीमच्या चिंतेत भर पडली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

Crime : चारित्र्याच्या संशयावरुन मारहाण, गर्भवती पत्नीचा मृत्यू; कुजलेल्या मृतदेहाजवळ तरुणाचे नको ते कृत्य

SCROLL FOR NEXT