Gautam Gambhir and Rohit Sharma saam tv
Sports

Rohit Sharma : रोहित शर्माबाबत गौतम गंभीरनं घेतला सर्वात मोठा निर्णय, पहिल्या वनडेत फेल झाल्यानंतर उचललं महत्वाचं पाऊल

Rohit Sharma latest news after india vs england 1st ODI: इंग्लंडविरुद्धच्या पहिल्याच वनडे सामन्यात फक्त ११ धावा करून बाद होणाऱ्या रोहित शर्माबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरनं रोहितबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

Nandkumar Joshi

इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतानं विजय मिळवला आणि इंग्लंड दौऱ्यातील पराभवाची मालिका खंडित झाली. वॉशिंग्टन आणि अक्षर पटेलच्या सुंदर खेळीनं हा विजय साकारला. खरे तर कर्णधार शुभमन गिलनं विजयाचा पाया रचला. पण भारताचे धुरंधर रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दिग्गज खेळाडू अपयशी ठरले. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरनं फेल ठरलेल्या रोहित शर्माबाबत मोठा आणि अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे.

रिपोर्ट्सनुसार, रोहित शर्मा जरी अपयशी ठरला असला तरी, त्याच्याबाबत चांगली वार्ता आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने रोहित शर्माला मोकळीक दिली आहे. रोहित शर्माने भविष्यातील गोष्टींकडे दुर्लक्ष करून सध्याच्या वनडे मालिकेत नैसर्गिक खेळ करावा. त्याने पूर्ण मोकळेपणाने फलंदाजी करावी, असे गंभीरकडून सांगण्यात आल्याचे कळते.

रोहित शर्माने खूप पुढचा विचार करू नये असा सल्लाही गौतम गंभीरने दिल्याचे सांगण्यात येत आहे. बेधडक आणि आक्रमक खेळी करणारा फलंदाज म्हणून रोहित शर्माला ओळखलं जातं. त्यानंही तसाच खेळ करावा आणि या मालिकेत चांगली कामगिरी करावी, अशी गंभीरला अपेक्षा आहे.

इंग्लंडविरुद्ध एजबेस्टनमध्ये पहिला वनडे सामना झाला. त्यात रोहित शर्मा अडखळताना दिसून आला. त्याने फक्त ११ धावा केल्या. पण त्यासाठी तब्बल २१ चेंडूंचा सामना करावा लागला. त्याचा स्ट्राइक रेट ५२.३८ होता. आक्रमक खेळीसाठी प्रसिद्ध असलेला रोहित शर्मा बचावात्मक फलंदाजी करताना दिसला. २०२३ च्या वर्ल्डकपपर्यंत तो आक्रमकपणे फलंदाजी करत होता. पॉवर प्लेमध्ये तो मोठी धावसंख्या उभारण्याचा विचार करत होता. पण जेव्हापासून त्याला कर्णधारपदावरून हटवण्यात आले, तेव्हापासून त्याच्या फलंदाजीच्या शैलीत तो आक्रमकपणा दिसलेला नाही. रोहित शर्मा धावा करत आहे, पण ती खेळी सावध आणि संथ असते. पण गंभीरला ते नकोय.

रोहित शर्माला भीती कशाची?

फलंदाजीत सातत्यपूर्ण कामगिरी करून पुढील वनडे वर्ल्डकप खेळण्याची रोहित शर्माची इच्छा आहे. पण तसे होईल, असे सध्या तरी वाटत नाही. रोहित आता ३९ वर्षांचा झाला आहे. जर त्याला दुखापत झाली तर, कमबॅक करणे कठीण होणार आहे. भारताकडे इशान किशन आणि यशस्वी जयस्वाल यांसारखे चांगले फलंदाज आहेत. वनडेमध्ये त्यांची कामगिरी कमालीची आहे. रोहित शर्मा कोणत्या कारणामुळं संघाबाहेर झाला तर, दोघांपैकी एकाला संधी मिळू शकते. त्यानं चांगली कामगिरी केली तर रोहितचं वनडे वर्ल्डकपमध्ये खेळणे दुरापास्त होणार आहे.

रोहित शर्मा प्रेशरमध्ये?

रोहित शर्मावर कुठे न कुठे दबाब असल्याचे जाणवत आहे. इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित दोन वनडे सामन्यांत चांगली कामगिरी व्हावी, असे रोहित शर्माला वाटत असावे. इंग्लंडच्या मैदानात वनडेमध्ये रोहित शर्माने खोऱ्याने धावा ओढल्या आहेत. या देशात त्याने सात वनडे शतके ठोकली आहेत. आता उर्वरित दोन सामन्यांमध्ये रोहित शर्मा कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Horoscope : स्वामींच्या कृपेने ५ राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार, गुरूवार तुमच्यासाठी कसा असेल?

Beed Crime: मुलीला का मारले? जाब विचारताच ५० वर्षीय महिलेच्या डोक्यात घातली वीट

Maharashtra News Live Update: आषाढी वारीपूर्वी पंढरपुरात वरुणराजाचा जलाभिषेक; वारकऱ्यांची एकच धावपळ

Pune : पुण्यात टँकरवर आता ऑनलाइन नजर, राज्यभर योजना राबवली जाणार, पाहा सरकरचा नेमका प्लान काय?

Samarth Movie: समर्थ रामदास स्वामींच्या विचारांची आधुनिक काळाशी सांगड; 'समर्थ' चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित

SCROLL FOR NEXT