virat kohli and rohit sharma  saam tv
Sports

WTC Final Records: WTC च्या अंतिम सामन्यात विराट अन् रोहितच्या नावे होणार मोठ्या विक्रमाची नोंद; एमएस धोनीला सोडणार मागे

Virat Kohli -Rohit Sharma Record: या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहलीच्या नावे एका मोठया विक्रमाची नोंद होणार आहे.

Ankush Dhavre

IND vs AUS WTC Final 2023: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला येत्या ७ जूनपासून प्रारंभ होणार आहे. केनिंगटन ओव्हलच्या मैदानावर पार पडणाऱ्या या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पहिल्या हंगामात भारतीय संघाला जेतेपद मिळवण्याची संधी होती. मात्र या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. आता दुसऱ्यांदा भारतीय संघाकडे जेतेपद मिळवण्याची संधी असणार आहे.

दरम्यान या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहलीच्या नावे एका मोठया विक्रमाची नोंद होणार आहे.

धोनीचा मोठा विक्रम मोडला जाणार..

भारतीय संघ आयसीसी स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. भारतीय संघासाठी आयसीसीचे सर्वाधिक अंतिम सामने खेळण्याचा विक्रम हा युवराज सिंगच्या नावे आहे. २००० साली आयसीसीचा पहिला अंतिम सामना खेळणाऱ्या युवराजने २००३ वनडे वर्ल्ड कप, २००७ टी -२० वर्ल्ड कप, २०११ वनडे वर्ल्ड कप, २०१४ टी -२० वर्ल्ड कप आणि २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे अंतिम सामने खेळले आहेत. अशाप्रकारे युवराजच्या नावे एकूण ७ अंतिम सामने खेळण्याचा विक्रम आहे.

युवराजनंतर ५ अंतिम सामने खेळण्याचा विक्रम एमएस धोनी,विराट कोहली आणि रोहित शर्माच्या नावे आहे. एमएस धोनीने २००७ टी -२० वर्ल्ड कप, २०११ वनडे वर्ल्ड कप, २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी, २०१४ टी -२० वर्ल्ड कप आणि २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी मैदानात उतरताच विराट कोहली आणि रोहित शर्मा हा विक्रम मोडून काढणार आहेत. यासह विराट कोहली आणि रोहित शर्माच्या नावे ६-६ अंतिम सामने खेळण्याची नोंद होणार आहे. (Latest sports updates)

विराट कोहलीबद्दल बोलायचं झालं तर तो २०११ वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत पहिल्यांदाच आयसीसीचा अंतिम सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. त्यानंतर २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी, २०१४ टी -२० वर्ल्ड कप, २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०२१ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व कारण्यासाठी मैदानात उतरला होता.

तर रोहितने २००७ टी -२० वर्ल्ड कप, २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी, २०१४ टी -२० वर्ल्ड कप, २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०२१ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

आयसीसीचे सर्वाधिक अंतिम सामने खेळणारे खेळाडू..

युवराज सिंग - ७

एमएस धोनी- ५

विराट कोहली- ५

रोहित शर्मा- ५

सचिन तेंडुलकर -४

रवींद्र जडेजा- ४

आर अश्विन - ५

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT