Rohit Sharma And virat kohli  afp
Sports

Team India: विराट- रोहितने आता एकच काम करावं..ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाने दिला लाखमोलाचा सल्ला

Greg Chappell On Rohit Sharma And Virat Kohli: भारताचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपल यांनी विराट कोहली आणि रोहित शर्माला मोलाचा सल्ला दिला आहे.

Ankush Dhavre

Greg Chappell On Rohit Sharma And Virat Kohli: भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या लाजिरवाण्या पराभवासह भारतीय फॅन्सचं टेन्शन वाढवणारी बाब म्हणजे विराट आणि रोहितचा फॉर्म.

दोघेही फलंदाजीत पूर्णपणे फ्लॉप ठरले आहेत. या दोघांची अशीच कामगिरी सुरु राहिली, तर बॉर्डर गावसकर मालिका जिंकणं कठीण होईल. दरम्यान ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू आणि भारताचा माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपलने विराट आणि रोहितला फॉर्ममध्ये येण्यासाठी मोलाचा सल्ला दिला आहे.

विराट आणि रोहित दोघेही धावा करताना संघर्ष करताना दिसून येत आहेच. या दोघांना सल्ला देत ग्रेग चॅपल म्हणाले की, 'या स्तरावर येऊन धावा करणं कठीण होऊन जातं, कारण तुम्हाला एकाग्र होऊन फलंदाजी करता येत नाही. वाढत्या वयामुळे आपली नजर कमजोर होते. जेव्हा तुम्ही युवा असता, त्यावेळी तुम्ही एकाग्र होऊन धावा करण्याच्या विचारात असता. मात्र वय जसंजसं वाढत जातं, तसं विरोधी खेळाडूंना तुमची कमकुवत बाजू कळू लागते.'

ग्रेग चॅपल यांच्या मते विराट कोहली, रोहित शर्मा आणि स्टीव्ह स्मिथ या खेळातील दिग्गज खेळाडू आहेत. या खेळाडूंना सल्ला देत ते म्हणाले की, ' जेव्हा तुम्ही तरुण असता, तेव्हा तुम्ही परिस्थिती आणि सामन्याची स्थिती यांसारख्या गोष्टींचा विचार करत नाही. त्यावेळी तुम्ही फक्त धावा करण्याचा विचार करता.' ग्रेग चॅपल यांनी सचिन तेंडुलकरचीही समजूत काढली होती. ते म्हणाले होते की, ' जर तुला तरुण खेळाडूसारखं खेळायचं असेल, तर तुला तसंच विचार करावं लागेल.'

विराट- रोहितला दिला मोलाचा सल्ला

भारताच्या दोन्ही दिग्गजांना मोलाचा सल्ला देत ते म्हणाले की, 'विराट हा आपल्या उत्साहासाठी ओळखला जातो. त्याची सध्याची कामगिरी ही सर्वांचं टेन्शन वाढवणारी आहे. आता त्याने एकाग्र राहण्यावर काम करावं. तर रोहितबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आपल्या फलंदाजीत आणि नेतृत्वाच्या जबाबदारीत समतोल साधावा.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विठ्ठल मंदिर जतन संवर्धन कामाचे ऑडिट होणार

Pune Crime : पुण्यात भयंकर घडलं! जेवणासाठी घरी बोलवलं, दारू पाजली; किरकोळ वादातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या

Youth Drowned: तलाव पाहून पोहण्याचा मोह आला अन् अनर्थ घडला; २० वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू

Politics : पंतप्रधान नरेंद्र मोदी विष्णूचे ११वे अवतार; कुणी केलं विधान? वाचा

'Saiyara' तू तो बदला नहीं है... या ट्रेंडींग गाण्याचा अर्थ काय?

SCROLL FOR NEXT