riyan parag twitter
Sports

Viral Video: इतका Attitude कशासाठी? सेल्फीसाठी मोबाईल घेतला, पण Riyan ने पुढे जे केलं.. ते पाहून संतापच येईल

Riyan Parag Throws Fans Mobile Phone: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेल्या सामन्यानंतर रियान परागचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

आयपीएल २०२५ स्पर्धा सुरु होण्याआधीच राजस्थान रॉयल्स संघाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. संजू सॅमसन संघात असूनसुद्धा ही जबाबदारी युवा अष्टपैलू खेळाडू रियान परागकडे सोपवण्यात आली. रियान सुरुवातीच्या ३ सामन्यांमध्ये राजस्थान रॉयल्स संघाचं नेतृत्व करणार असल्याचं संजूने आधीच सांगितलं होतं.

रियानच्या नेतृत्वात राजस्थानने सुरुवातीचे २ सामने गमावले, तर तिसऱ्या सामन्यात विजयाची नोंद केली. दरम्यान चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध झालेल्या सामन्यानंतर रियान परागने असं काही केलं, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय

फॅन्सचा मोबाईल फेकला

आपल्या आवडत्या खेळाडूला खेळताना पाहण्यासाठी फॅन्स आतुरतेने वाट पाहत असतात. जर आवडत्या खेळाडूसोबत सेल्फी घेण्याची संधी मिळाली, तर ही संधी कोणीच सोडणार नाही. अशीच काहीशी संधी गुवाहाटी स्टेडियमच्या स्टाफमध्ये काम करत असलेल्या सदस्यांना मिळाली.

काही फॅन्सने रियानला सेल्फी काढण्याची विनंती केली. त्याने हसत सेल्फी तर घेतला, मात्र सेल्फी घेतल्यानंतर त्याचा मोबाईल फेकून दिला. हा व्हिडिओ व्हायरल होताच, चाहते चांगलेच संतापले आहेत.

कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात एक फॅन सुरक्षा रक्षकांना चकवा देऊन मैदानात आला आणि रियान परागच्या पाया पडला होता. त्यावेळीही रियान परागचा अॅटीट्यूड दिसून आला होता.

त्यानंतरही त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. आता मोबाईल फेकल्यानंतर पुन्हा त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. इतका अॅटीट्यूड कशासाठी? धोनी, कोहली आणि रोहितनेही इतका अॅटीट्यूड दाखवला नसेल.. अशी जोरदार टीका रियान परागवर केली जाऊ लागली आहे.

राजस्थानचा शानदार विजय

तर या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या राजस्थान रॉयल्सला २० षटकअखेर १८२ धावा करता आल्या. या धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्ज संघाला १७६ धावांपर्यंत मजल मारता आली. हा सामना राजस्थानने ६ धावांनी आपल्या नावावर केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cough Syrup: जीवघेण्या कफ सिरफ कंपनीच्या मालकाला अखेर अटक, औषधामुळे २० मुलांचा मृत्यू

Kanpur Blast: रस्त्याच्या कडेला उभ्या बाईकमध्ये अचानक मोठा स्फोट, ८ जण गंभीर जखमी; नेमकं काय घडलं?

OBC आरक्षण संपवल्यात जमा..., व्हॉट्सअप स्टेटस ठेवत तरुणाची आत्महत्या; मुख्यमंत्र्यांना केली विनंती

Kantara Chapter 1 Collection : बॉक्स ऑफिसवर 'कांतारा' चं तुफान, आठवड्याभरात पार केला 300 कोटींचा टप्पा

Maharashtra Live News Update: अहिल्यानगरमध्ये असदउद्दीन ओवेसीची आज होणार सभा

SCROLL FOR NEXT