Rishabh Pant Car Accident  Saam Tv
Sports

Rishabh Car Accident : ऋषभ पंतने अपघाताबाबत केला मोठा खुलासा; म्हणाला, 'अपघात डुलकी लागल्याने नाही,तर...'

ऋषभ पंतने त्याचा अपघाताबाबत मोठा खुलासा केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Rishabh Pant News : टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक, फलंदाज ऋषभ पंत अपघातामुळे रुग्णालयात उपचार घेत आहे. ऋषभ पंतने त्याचा अपघाताबाबत मोठा खुलासा केला आहे. ऋषभच्या अपघाताचं आता खरं कारण समोर आलं आहे. (Latest Marathi News)

दिल्ली अँड डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोशिएशनचे डायरेक्टर श्याम शर्मा यांनी ऋषभ पंतची रुग्णालयात भेट घेतली. पंतने श्याम शर्मा यांच्याशी बोलताना अपघाताबाबत मोठा खुलासा केला आहे.

श्याम शर्माच्या म्हणण्यानुसार, पंतचा अपघात हा डुलकी लागल्याने झाला नाही. तर रस्त्यावरील खड्ड्यामुळे झाला. श्याम शर्मा यांनी वृत्त संस्थेला माहिती देताना मोठा खुलासा केला आहे. श्यास शर्मा यांनी ऋषभ पंतला अपघाताबाबत विचारलं, तर त्याबाबत मोठा खुलासा केला. 'रात्रीची वेळ होती. त्यावेळी अचानक रस्त्यात खड्डा समोर दिसला. त्या खड्ड्यापासून वाचवून वाहन चालविण्याच्या नादात अपघात झाला'.

पंत उपचारासाठी लंडनला जाऊ शकतो

पंत सध्या डेहरादूनच्या मॅक्स रुग्णालयात उपचार घेत आहे. पंतला लिगमेंटच्या उपचारासाठी लंडनला जावं लागू शकतं. मात्र, याचा निर्णय बीसीसीआय घेणार आहे. तसेच पंतला दुसऱ्या रुग्णालयात हलविण्याचा निर्णय देखील बीसीसीआय घेईल.

२ महिन्यांनी पंत दिसणार मैदानात

'डीडीसीए'चे राजन मनचंदा यांनी सांगितले की, 'आतापर्यंत ऋषभचे उपचाराबाबत रिपोर्ट आले आहेत, त्यात त्याला गंभीर दुखापत झाली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आशा आहे की, पंत २ महिन्यांनी मैदानात परतू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Idli- Dosa For Diabetes: डायबिटीजचे रूग्ण इडली, डोसा खाऊ शकतात का? जाणून घ्या ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी काय खावे?

Gold Price Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अचानक भाव घसरला; किती रुपयांनी झालं स्वस्त?

Maharashtra News Live Update: जळगावात पुन्हा भीषण अपघात टँकरच्या धडकेत आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू; दोन जखमी

पुण्यात अवघ्या १३ लाखांत हक्काचं घर, म्हाडाचा ४४६२ फ्लॅटचा धमाका, लोकेशनची नावं समोर, वाचा A टू Z माहिती

Bank Holiday List: उद्या बँकेत काम असेल तर थांबा! महाराष्ट्रासह अनेक राज्यांत बँका बंद

SCROLL FOR NEXT