rinku singh special post for yash dayal after his bowling performance in rcb vs csk match amd2000 twitter
Sports

Rinku Singh- Yash Dayal: एका ओव्हरमध्ये ५ षटकार मारणाऱ्या रिंकूची यश दयालसाठी खास पोस्ट - Photo

Rinku Singh Post For Yash Dayal: रिंकू सिंगने यश दयालच्या एकाच षटकात ५ षटकार मारले होते. आता शानदार गोलंदाजी केल्यानंतर रिंकू सिंगने पोस्ट शेअर करत त्याचं कौतुक केलं आहे.

Ankush Dhavre

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने आपल्या शेवटच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाला पराभूत करत आयपीएल २०२४ स्पर्धेच्या प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. हा दोन्ही संघांसाठी नॉकआऊट सामना होता.

कारण या सामन्यात पराभूत होणाऱ्या संघाचा प्रवास इथेच थांबणार होता. शेवटच्या षटकात चेन्नई सुपर किंग्जला हा सामना जिंकण्याची सुवर्णसंधी होती. शेवटी यश दयालने शानदार गोलंदाजी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. दरम्यान यश दयालच्या शानदार गोलंदाजीनंतर रिंकू सिंगने एक खास पोस्ट शेअर केली आहे.

रिंकू सिंगची पोस्ट व्हायरल

यश दयाल गोलंदाजी करण्यासाठी आले त्यावेळी एमएस धोनी आणि रविंद्र जडेजा स्ट्राईकवर होते. या षटकातील पहिल्याच चेंडूवर एमएस धोनीने थेट मैदानाबाहेर षटकार मारला. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर त्याने धोनीला बाद करत माघारी धाडलं. त्याची ही शानदार गोलंदाजी पाहता रिंकू सिंगने त्याचा उत्साह वाढवणारी पोस्ट शेअर केली आहे. त्याने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर यश दयालचा फोटो शेअर केला आहे. ज्यावर त्याने 'देवाचा प्लान..'असं लिहिलं आहे.

गतवर्षी झालेल्या आयपीएल स्पर्धेत यश दयालने गुजरात टायटन्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. या संघाचे प्रतिनिधित्व करताना रिंकू सिंगने त्याच्या एकाच षटकात सलग ५ षटकार मारले होते. हे त्याच्यासाठी वाईट स्वप्नापेक्षा कमी नव्हतं. या सामन्यानंतर त्याच्या गोलंदाजी क्षमतेवर प्रश्न उपस्थित केले गेले होते. हे हंगाम झाल्यानंतर गुजरात टायटन्स संघाने त्याला रिलीझ करण्याचा निर्णय घेतला.

मात्र रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने त्याच्यावर विश्वास दाखवला आणि ५ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिलं. यश दयालनेही आपल्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला आणि संघाला विजय मिळवून दिला. या शानदार कामगिरीच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने प्लेऑफचं तिकीट मिळवलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Women: फक्त ४ धावांसाठी टीम इंडियाने सामना गमावला, उपांत्य फेरीची धकधक वाढली

शिंदे गटाचा दणका;KDMC मध्ये भाजप आणि काँग्रेससह ठाकरे गटाला खिंडार; शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल

Heartbreaking: लेकाच्या मृत्यूची बातमी ऐकताच आईनेही सोडले प्राण; मन हेलावून टाकणारी कहाणी

Mumbai Fire: सिलेंडरचा स्फोट होऊन वरळीमधील झोपडपट्टीला आग,12 ते 15 झोपड्या जळून खाक

Pune Shaniwarwada: शनिवारवाड्यासमोर नमाज पठण, 'मजार हटवा,भगवा झेंडा फडकवू द्या'

SCROLL FOR NEXT