Ricky Ponting Saam Tv
Sports

Ricky Ponting: लाईव्ह मॅचदरम्यान रिकी पाँटिंगची तब्येत अचानक बिघडली; तातडीने रुग्णालयात दाखल

ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी सामन्यावर कॉमेंट्री करत असताना त्याची तब्येत अचानक बिघडली.

साम टिव्ही ब्युरो

सिडनी : ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगची तब्येत अचानक बिघडली. लाईव्ह मॅचदरम्यान ही घटना घडल्याने सगळ्यांचीच धावपळ झाली.

पॉँटिंगला पर्थ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो पर्थमध्ये खेळल्या जात असलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी सामन्यावर कॉमेंट्री करत असताना त्याची तब्येत अचानक बिघडली. (Sports News)

ऑस्ट्रेलियन वृत्तपत्र डेली टेलिग्राफने दिलेल्या वृत्तानुसार, पॉन्टिंगच्या सहकाऱ्यांनी त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे. पाँटिंगला अस्वस्थ वाटत होते, म्हणून सावधगिरीच्या तपासणीसाठी तो रुग्णालयात गेला होता. वृत्तानुसार, पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी पाँटिंगला लंचच्या सुमारास पर्थच्या रुग्णालयात नेण्यात आले. त्यामुळे आता तो तिसऱ्या सत्रात कॉमेंट्री करताना दिसणार नाही.  (Latest Marathi News)

सध्या वेस्ट इंडिजचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील पहिला सामना 30 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात रिकी पाँटिंग कॉमेंट्री करत होता. पाँटिंगसोबतची ही घटना तिसऱ्या दिवशी म्हणजे आज घडली.

यादरम्यान पाँटिंगने चक्कर आल्याची तक्रार केली आणि त्याला अस्वस्थ देखील वाटत होतं . यानंतर पाँटिंगला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. ऑस्ट्रेलियन वृत्तपत्र डेली टेलिग्राफने पाँटिंगच्या सहकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, पाँटिंगची प्रकृती स्थिर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramayan Jai Jai Ram Song: गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर 'रामायण'ची खास भेट; रणबीर-साई पल्लवीचं 'जय जय राम' गाणं रिलीज

Fitness Test : तुम्ही खरंच फिट आहात का? फक्त ३० सेकंदांत कळंल, जिमचीही गरज नाही

Maharashtra News Live Update: पुण्यात तालचक्र ढोल ताशा पथकाकडून संबळ वादन

Ration Card Big Update: रेशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी! SC-STसह 5 प्रवर्गांच्या जातीच्या अपडेटबाबत मोठा निर्णय

Ring Side Effects : नेहमी अंगठी घालता? तर वेळीच व्हा सावधान! छोट्याशा रिंगमुळे होतील 'या' ७ गंभीर समस्या

SCROLL FOR NEXT