virat kohli vs gautam gambhir saam tv
Sports

Virat Kohli vs Gautam Gambhir: स्वतःचा मॅन ऑफ द मॅच अवाॅर्ड विराटला देणारा गंभीर, अचानक विराट सोबत भांडू का लागला?

Virat Kohli And Gautam Gambhir Fight Reason: एकेकाळी एकाच संघातून खेळणाऱ्या या दोन्ही खेळाडूंमध्ये इतका वैर का? काय आहे कारण? जाणून घ्या.

Ankush Dhavre

LSG VS RCB IPL 2023, Virat Kohli - Gautam Gambhir: विराट कोहली आणि गौतम गंभीर हे जेव्हा जेव्हा आमने सामने येतात तेव्हा राडा होतोच.गेल्या काही वर्षांपासून असच काहीसं चित्र पाहायला मिळत आहे. लखनऊ सुपर जायंट्स विरुध्द रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात झालेल्या सामन्यानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीर पुन्हा एकदा आमने सामने आले.

या घटनेनं २०१३ मध्ये झालेल्या घटनेला उजाळा दिला. मात्र एकेकाळी एकाच संघातून खेळणाऱ्या या दोन्ही खेळाडूंमध्ये इतका वैर का? काय आहे कारण? जाणून घ्या. (Latest sports updates)

काय आहे कारण?

माध्यमातील वृत्तानुसार, गौतम गंभीर आणि माजी भारतीय कर्णधार एमएस धोनी यांचं एकमेकांसोबत पटत नव्हतं. तर याउलट विराट कोहली हा धोनीचा खूप चांगला सहकारी आहे.

विराट ज्यावेळी आपल्या कारकीर्दीत पुढे जात होता, त्यावेळी गौतम गंभीरला आपल्या कारकीर्दीचा शेवट दिसू लागला होता. संघात आपलं स्थान बळकट केल्यानंतर विराटला भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी देखील मिळाली.

हाच राग मनात असल्याने गंभीर आणि विराटचं पटत नसल्याचे वृत्त अनेकदा समोर आले आहे.

लखनऊ सुपर जायंट्स विरुध्द रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामन्यात काय घडलं?

या सामन्यात जेव्हा लखनऊ सुपर जायंट्स संघाची फलंदाजी सुरू होती. त्यावेळी विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यात बाचाबाची सुरु असल्याचे पाहायला मिळाले होते. जेव्हा नवीन उल ह बाद होऊन माघारी परतला.

त्यावेळी देखील विराट कोहली काहीतरी बोलताना दिसून आला होता. हा वाद सामना झाल्यानंतर आणखी पेटला. खेळाडू जेव्हा हात मिळवणी करत होते, त्यावेळी देखील दोघे एमकेकांना काहीतरी बोलताना दिसून आले होते.

दरम्यान संघातील खेळाडू मध्यस्थी करण्यासाठी आले त्यावेळी गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यात वाद सुरु झाला होता. मात्र इतर खेळाडू मध्ये पडल्याने हा वाद जास्त चिघळला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

Thackeray Brothers : ठाकरेंच्या लढ्याला दक्षिणेचा पाठिंबा, थेट मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक, म्हणाले प्रेरणादायी...

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

SCROLL FOR NEXT