Harmanpreet kaur  Saam Tv
Sports

Harmanpreet Kaur Angry On Run-Out: हलगर्जीपणामुळे रनआउट झाल्यानंतर हरमनचा संताप अनावर,मैदानाच्या बाहेर जात असताना केलं असं काही

Reaction VIDEO: सहजरित्या २ धावा पूर्ण होतील असे वाटत असताना क्रीजमध्ये पोहचण्याआधीच तिची बॅट फसली आणि ती धावबाद झाली

Ankush Dhavre

India Team News: गुरुवारी आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील सेमीफायनलचा सामना पार पडला. या सामन्यात भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ आमने सामने आले होते.

या रोमांचक सामन्यात भारतीय संघाने शेवटच्या षटकापर्यंत विजयासाठी झुंज दिली, मात्र भारतीय संघाला हा सामना ५ धावांनी गमवावा लागला. दरम्यान या महत्वाच्या सामन्यात धावबाद होऊन माघारी परतलेली हरमनप्रीत कौर माघारी परतत असताना प्रचंड संताप व्यक्त करताना दिसून आली. (Latest Sports Updates)

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला १७३ धावांचे आव्हान दिले होते. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला हवी तशी सुरुवात करता आली नाही.

अवघ्या ३० धावांवर भारतीय संघातील प्रमुख फलंदाज माघारी परतले होते. मात्र त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने एक बाजू सांभाळत किल्ला लढवायला सुरुवात केली. हरमनप्रीत आणि जेमिमाने मिळून ६९ धावांची भागीदारी केली. मात्र जेमिमा ४३ धावा करत माघारी परतली.

हरमनप्रीत कौर झाली रनआउट..

हरमनप्रीत कौर भारतीय संघासाठी महत्वाची खेळी करत होती. तिने या डावात ३४ चेंडूंचा सामना करत ५४ धावांची खेळी केली. तर १४ वे षटक सुरु असताना हरमनप्रीत कौरने लेग साईडच्या दिशेने शॉट मारला.

ती दोन धावा घेण्यासाठी धावली. खूप सहजरित्या २ धावा पूर्ण होतील असे वाटत असताना क्रीजमध्ये पोहचण्याआधीच तिची बॅट फसली आणि ती धावबाद झाली.

अशा पध्दतीने बाद झाल्यामुळे ती संताप व्यक्त करताना दिसून आली. तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय, ज्यात ती मैदानाच्या बाहेर जात असताना बॅट फेकताना दिसून येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जमिनीच्या व्यवहारांवर ITची नजर; 2 लाखांवरील रोखीचे व्यवहार रडारवर

डिलिमिटेशन बिलासाठी खासदारांचा भाव 150 कोटी; राऊतांचा भाजपवर खळबळजनक आरोप

मामाच्या मुलीशी लग्नावर बंदी येणार? नातेवाइकांमधील विवाह रोखण्यासाठी नवा कायदा?

Maharashtra News Live Update: चाकणमध्ये बेशिस्त वाहतुकीचा फटका; पुणे-नाशिक महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

ते एक वर्षभरापूर्वीचं वक्तव्य अन् सोने-चांदीचा भाव गडगडला; PM नरेंद्र मोदींनी सांगितलं नेमकं कारण

SCROLL FOR NEXT